32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
घरराजकारणकितने आदमी थे, अभी दो ही बचे है! उद्धव ठाकरेंना टोला

कितने आदमी थे, अभी दो ही बचे है! उद्धव ठाकरेंना टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली फटकेबाजी

Google News Follow

Related

मुंबई भाजपाच्या वतीने माटुंगा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळावा आणि सत्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधताना फडणवीस यांनी सांगितले की, मला अमिताभ बच्चन म्हटले गेले. पण माझं शरीर अमजद खानसारखं आहे. अमिताभ बच्चन म्हणत आहे तर मला एक विचारावेसे वाटते, कितने आदमी थे. ६५ से ५० निकल गए. सबकुछ बदल गया. अभी दो ही बचे है. अर्थात त्यांचाही सन्मान आहे.

मुंबई भाजपा अध्यक्ष ऍड. आशीष शेलार तसेच कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. फडणवीस म्हणाले की, निवडणूक जवळ आली की, लगेच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान वगैरे बोलले जाऊ लागेल. कोण तोडतंय मुंबईला. संविधान आहे. पण लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला जात आहे. दिल्ली समोर झुकत असल्याचे बोलले जाते. पण आम्ही मुंबईकरांच्या हितासाठी दिल्लीला जाणारच.

फडणवीसांनी उत्सवांबद्दलही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, काल उत्सवी परंपरा पाहिली का. आपल्या सरकार आल्यावर हे सगळं घडतं आहे. आता सर्व जोरजोरात होणार आहे. दिवाळी जोरात, आंबेडकर जयंती जोरात, शिवजयंतीही जोरात. आता मुख्यमंत्री बसणार नाही आणि तुम्हालाही घरी बसावे लागणार नाही.

हे ही वाचा:

‘फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू’

२६/११ प्रमाणे सोमालियात हॉटेलात घुसले अतिरेकी

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

आशीष शेलार यांचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, आशीष तुम्ही क्रिकेट खेळणारे, जाणणारे आहात. मुंबई कशी जिंकता येईल हे तुम्हाला चांगले माहीत आहे. तुम्हीच सामना जिंकणार आहात. शेलारांनी मुंबई प्रीमियर लीग सुरू केली आता विकासाची मुंबई लीग सुरू करायची आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा