32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारण'फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू'

‘फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू’

आशिष शेलार यांनी डायलॉगबाजी करत शिवसेनेवर तुफान फटकेबाजी केली आहे.

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचा षण्मुखानंद सभागृहत मेळावा पार पडला आहे. मुंबई भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी डायलॉगबाजी करत शिवसेनेवर तुफान फटकेबाजी केली आहे. फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू, असे म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोलेबाजी केली आहे. तसेच मुंबईतील समस्यांची जाण असल्यानेच अध्यक्षपदी निवड झाल्याचे शेलार यावेळी म्हणाले.

या मेळाव्यात टोल, रस्ते, खड्डे आणि विकास कामांवरुन आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबई अध्यक्षपदावरुन झालेल्या टीकेला देखील शेलारांनी या कार्यक्रमात उत्तर दिले आहे. भाजपा अध्यक्षपदाबद्दल बोलताना ते म्हणाले, भाजपाने मला पुन्हा एकदा मुंबईचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली असून, मी तिसऱ्यांदा अध्यक्ष बनलो आहे. पक्षाने आशिष शेलारला अध्यक्ष बनवलं नाही तर एका विचाराला, समस्येला, एका जागृतीला अध्यक्ष बनवलंय. सात रस्त्याच्या कुंभारचाळीत राहणाऱ्या व्यक्तीला भाजपाने अध्यक्ष बनवलं आहे.

पुढे शिवसेनवर टीका करत शेलार म्हणाले, ४५ हजार कोटींचं बजेट असलेल्या मुंबईत शिवसेनेने काय केले आहे. देशातल्या सात राज्यांचं बजेट मुंबईपेक्षा कमी आहे. तरीही त्या राज्यांत मुंबईच्या तुलनेत सुविधा जास्त आहेत. महापालिका एवढी श्रीमंत असताना मुंबईकरांसाठी शिवसेनेनं काय केलं? त्यांना कोणत्या सुविधा दिल्या? असा सवाल आशिष शेलारांनी केला मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. कोस्टल रोडची परवानगी फडणवीसांनी दिली.

मुंबईचे पूल भाजपाच्या नितीन गडकरींनी दिले आहे. अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ हेरून तिला सुरक्षित करण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केले आहे. मिठीला स्वच्छ करण्यासाठी केंद्राने निधी केला आहे. पण शिवसेनेने काय दिलं फक्त भ्रष्टाचार दिला. ही लढाई अधर्म, घराणेशाहीच्या विरोधात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबईची सत्ता भाजपाला मिळेल, असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा:

२६/११ प्रमाणे सोमालियात हॉटेलात घुसले अतिरेकी

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

पुढे आशिष शेलार म्हणाले, आता मुंबईकरांना मालवणीच्या झोपडपट्टीत हिंदूंवर अन्यायाविरोधात संघर्ष करणारा मंगलप्रभात लोढा हवाय, मुंबईत कुर्ल्याच्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना स्वतःचं घर मिळण्यासाठी संघर्ष करणारा गोपाळशेट्टी हवाय, टोल नाक्यावरील भ्रष्टाचाराचा बिमोड करणारा मनोज कोटक हवाय, सोसायटी-चाळीचं घर विकसित करण्यासाठी संघर्ष करणारी पूनमताई महाजन हवी आहे, घरासाठी संघर्ष करणारा अतुल भातखळकर हवाय. दरम्यान, या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते कार्यक्रमाला उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा