29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरक्राईमनामामुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला लायटिंग

मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला लायटिंग

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनच्या कबरीवर लायटिंग आणि संगमरवरी फरशी लावण्यात आल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.

Google News Follow

Related

मुंबईमध्ये १९९३ मध्ये साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. या प्रकरणातील आरोपी याकुब मेमन याला २०१५ साली फाशी देण्यात आली होती. त्यानंतर याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. मात्र, आता या कबरी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकुब मेमनच्या कबरीवर लायटिंग आणि संगमरवरी फरशी लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याकुब मेमन याला फाशी दिल्यानंतर बडा कब्रस्तानमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही बडा कब्रस्तानची जागा वक्फ बोर्डाच्या अखत्यारित येते. कब्रस्तानमधील व्हिडिओ समोर आला असून दहशतवादी याकुब मेमन याच्या कबरीवर संगमरवर फरशी, लायटिंग लावण्यात आल्याचं दिसत आहे. शिवाय वीज कनेक्शनद्वारे कबरीवर लावण्यात आलेल्या लाईट्सला वीज पुरवठा केला जात आहे. तर या ठिकाणी पहारा देण्यासाठी काही व्यक्ती असल्याचंही दिसून येत आहे.

कब्रस्तानमधील दफन केलेल्या मृतदेहाची जागा ही १८ महिन्यांत खोदण्यात येते. मात्र, आता पाच वर्षे झाल्यानंतरही याकुब मेमनची कबर का खोदली गेली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच याकुबच्या कबरीवर इतका खर्च कोण करत आहे? हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा:

अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध

अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर

सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा

बडा कब्रस्तानचे अध्यक्ष  शोएब खातीब यांच्याशी ‘टीव्ही ९’ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, कबरीवर कुठलेली लायटिंग केलेलं नाही. अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. समोर आलेले व्हिडीओ जुने असल्याचे ते म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा