26 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरविशेषतिने आपल्या लहानग्याला वाघाच्या जबड्यातून खेचून आणले

तिने आपल्या लहानग्याला वाघाच्या जबड्यातून खेचून आणले

दोघांचीही प्रकृती आता स्थिर आहे आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू

Google News Follow

Related

महाराष्ट्रातल्या हिरकणीची कहाणी आपल्याला कायम प्रेरणा देत राहते. आपल्या छोट्या बाळासाठी बेलाग कडा उतरणारी हिरकणी कुणीही विसरू शकत नाही. मध्य प्रदेशातही एका आईने असेच शौर्य दाखविले. २५ वर्षीय अर्चना चौधरीने वाघाच्या जबड्यातून आपल्या १५ महिन्यांच्या बाळाला बाहेर काढले. काय होती तिची ही थरारक आणि तेवढीच प्रेरणादायी कहाणी…

मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात रोहानिया गावात ही घटना घडली. बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या कक्षेत हे गाव येते. रविवारी आपल्या या लहानग्याला घेऊन प्रातःविधीसाठी गेली होती. तेवढ्यात झुडपातून वाघ आला आणि तिने तिच्या मुलाला जबड्यात पकडले. पण अर्चना यांनी न घाबरता त्या वाघाला आव्हान दिले आणि या कठीण प्रसंगात पळून न जाता त्याच्याशी सामना केला. शिवाय, आरडाओरडा करून गावकऱ्यांना जमविले. त्यामुळे घाबरलेल्या वाघाने ते बाळ आणि अर्चना यांना सोडून जंगलात धाव घेतली.

हे ही वाचा:

सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा

लव्ह जिहाद प्रकरणावरून नवनीत राणा पोलिसांना नडल्या

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यासाठी भेटले नेपाळच्या पंतप्रधानांना

कर्मचाऱ्याने स्वतःच्याच कार्यालयात घातला दरोडा; अशी पकडली गेली चोरी

 

पण या घटनेमुळे ते बाळ जखमी झाले. त्याच्या आईलाही गंभीर दुखापत झाली. बाळाच्या डोक्याला आणि पाठीला जखम झाली असून अर्चना यांच्या हात, मनगट आणि पाठीला जखमा झाल्या आहेत. त्यांचे पती भोला प्रसाद यांनी ही माहिती दिली.

या दोघांनाही उमरिया जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. नंतर जबलपूर वैद्यकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वन अधिकाऱ्यांनी त्या वाघाचा शोध सुरू केला असून त्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांनी सांगितले की, या दोघांचीही प्रकृती आता ठीक आहे पण त्यांच्यावर डॉक्टरांकडून पूर्ण लक्ष ठेवले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा