26 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरविशेषसर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा

सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा

Related

रस्ते अपघातात मृत्यू हाेण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन माेदी सरकारने महत्वाचा निर्णंय घेतला आहे. यापुढे कारमध्ये बसलेल्या प्रत्येकाला सीटबेल्ट घालावा लागणार आहे. सीटबेल्ट लावलेला नसेल तर १००० रुपये दंड भरावा लागणार असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे.

कार चालक आणि त्याच्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तीने सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे. पुढील सीटवर बसलेल्याने सीटबेल्ट लावलेला नसल्यास दंड अशी तरतूद नियमात आहे. पण आता मागच्या आसनावर बसलेल्या व्यक्तीलाही सीटबेल्ट लावावा लागेल अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात तीन दिवसात आदेश काढण्यात येणार असल्याचं म्हटल्या जात आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबई -अहमदाबाद महामार्गावर कार अपघात मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी मागच्या आसनावर बसलेल्या मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता असे प्राथमिक तपासात दिसून आल्याचे बाेलले जात आहे. मिस्त्री यांचा अपघात आणि एकूणच रस्ते अपघातातील वाढते मृत्यूचे प्रमाण राेखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कार चालवताना चालक आणि त्याच्या बाजुला बसणाऱ्या व्यक्तीनं सीटबेल्ट लावणं बंधनकारक आहे. पण बऱ्याचदा सीटबेल्ट लावणे टाळले जाते. वास्तविक सीटबेल्ट हा अपघाताच्यावेळी बचावाचे माेठं अस्त्र म्हणून काम करते. पण तरीही काहींना सीटबेल्ट लावणे त्रासदायक वाटते. परंतु आता केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार कारमधील प्रत्येकालाच सीटबेल्ट बांधणं बंधनकारक असेल. या संदर्भात येत्या तीन दिवसात आदेेश काढण्यात येणार असल्याचं म्हटल्या जात आहे.

हे ही वाचा:

मॉस्कोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा

शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक

थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?

पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला

सायरस मिस्त्री यांच्या यांच्या अपघातानंतर उद्याेगपती आनंद महिंद्र यांनी देखील ट्विट करून सीटबेल्टचे महत्वं सांगितलं हाेते. मी गाडीत बसल्यावर नेहमीच सीटबेल्ट वापरताे. मागल्या आसनावर बसलेलाे असलाे तरीही त्यांनीही सीटबेल्ट लावण्याची शपथ घ्यावी. आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासाठी ही शपथ घेऊया असे आनंद महिंद्र यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२० मध्ये, भारतात वेगामुळे एकूण २,६५, ३४३ रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये ९१,२३९ लोकांचा मृत्यू झाला. २०२० वर्षात चारचाकी वाहनांमध्ये ११ टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू आणि दुखापती सीट बेल्ट न लावल्यामुळे २०२० मध्ये सीट बेल्ट न लावल्यामुळे १५,१४६ लोकांचा मृत्यू झाला आणि ३९,१०२ जण जखमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,966चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा