34 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरविशेष'कर्तव्यपथ'वर झाले शिक्कामोर्तब

‘कर्तव्यपथ’वर झाले शिक्कामोर्तब

एनडीएमसीच्या बैठकीत नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

Google News Follow

Related

मोदी सरकारने मोठा निर्णय घेत दिल्लीच्या राजपथचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या अशा राजपथाचे नाव ‘कर्तव्यपथ’ करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली होती. त्याप्रमाणे आज एनडीएमसीच्या बैठकीत नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

आज, ७ सेप्टेंबरला एनडीएमसीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्यपथ’ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी, देशाला गुलामगिरीतून मुक्त होण्याबाबत बोलले होते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर गुलामगिरीचे कोणतेही प्रतीक राहू नये, सर्व काही नवीन भारताच्या संकल्पनेसाठी एक शक्तिशाली शक्ती असल्याचे सिद्ध झाले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. तेव्हापासून राजपथचे नाव कर्तव्यपथ होणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर आजच्या बैठकीत नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेट या संपूर्ण मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. राजपथाच्या बाजूने सेंट्रल व्हिस्टा ऍव्हेन्यूमध्ये राज्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल, ग्रॅनाइट वॉकवे, वेंडिंग झोन, लॉन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा अशा सुविधा असणार आहेत. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली होती.

हे ही वाचा:

Asia Cup 2022: श्रीलंकेकडून पराभव आता भारतासाठी ‘आशा’ कप

वर्षा उसगावकर असे काय बोलल्या की त्यांना मागावी लागली माफी

मॉस्कोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा

शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक

मोदी सरकार येताच रेड कोर्स रोडचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग असे करण्यात आले. तसेच राजधानीतील प्रतिष्ठित भाग असलेल्या ल्यूटन्समधील पाच रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी भाजपाने दिल्ली महापालिकेकडे केली आहे. अकबर रोड, तुघलक रोड ही नावे बदलण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा