27 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरदेश दुनियामॉस्कोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा

मॉस्कोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा

लोककवी, लेखक आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आणि त्यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात येणार आहे.

Related

देवेंद्र फडणवीस करणार अनावरण

लोककवी, लेखक आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आणि त्यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात येणार आहे. रशियाचे राजधानीचे शहर मॉस्कोमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

मॉस्को शहरातील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला आहे. मॉस्को शहराच्या मध्यभागी एका प्रांगणात संस्थेच्या वतीने अनेक जगविख्यात व्यक्तींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा समावेश झाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४ सप्टेंबरला या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे पुढच्या आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर जाणार असून विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

हे ही वाचा:

शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक

थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?

पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला

ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

भारत- रशिया या दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने रशियात एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ मॉस्कोमध्ये १४ आणि १५ सप्टेंबर रोजी ही परिषद घेण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,941अनुयायीअनुकरण करा
40,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा