24 C
Mumbai
Tuesday, December 23, 2025
घरराजकारण'रझाकारांची पुढची औलाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील होत नाही'

‘रझाकारांची पुढची औलाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील होत नाही’

राज ठाकरे यांनी पत्रातून व्यक्त केले परखड वक्तव्य

Google News Follow

Related

‘रझाकारांचं लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं.  त्यामुळं  मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं बोललं  जात नसेल? अर्थात  हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते, आणि दुर्देव असं की, माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे, असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात केलं आहे.

संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक ‘सजा कार’ पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष सभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा’कार अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि सजा कार ह्या दोघांचा बंदोबस्त करेलच असही राज ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या पत्रात म्हटलं आहे.

माझं मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की, तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील लढ्यात हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे अशा शब्दात ठाकरे यांनी असो, आजच्या मुक्ती संग्रामाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला आपल्या पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

आजचा दिवस सणासारखा साजरा व्हावा

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस  दिवस खर तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.  हैदराबादच्या निजामाला हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हव होतं आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.

हे ही वाचा:

हे राष्ट्र स्मारकांचे!

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

‘जन धन’ नावाचा चमत्कार!

संग्रामाचा इतिहास पाठ्यपुस्तकात शिकवावा

आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये या कडेही त्यांनी लक्ष वेधलं.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा