27 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरविशेषलहान मुलांना वेठबिगारी करून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचा राज ठाकरेंचा इशारा

लहान मुलांना वेठबिगारी करून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचा राज ठाकरेंचा इशारा

लहान मुलांकडून काम करून घेतले जात असेल तर पोलिसांत तक्रार करण्यास राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

Google News Follow

Related

राज्यात लहान मुलांकडून वेठबिगारी करून घेण्याच्या घटना समोर येत आहेत. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून लहान मुलांना वेठबिगारी करून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. लहान मुलांकडून काम करून घेतले जात असेल तर पोलिसांत तक्रार करण्यास राज ठाकरे यांनी सांगितले आहे. सोबतच अशी घटना घडली तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार टाकण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडले जाते आहे, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचे उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे. प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.

हे ही वाचा:

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ शब्द काढणार?

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी, असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील, असं राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहलं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा