अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत पाकिस्तानसंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तान हा एक जगातील सर्वात धोकादायक देश आहे असं वक्तव्य जो बायडन यांनी केले आहे. डेमोक्रेटिक काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात बायडन यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. व्हाईट हाऊसने जो बायडन यांच्या वक्तव्याबाबत निवेदन जारी केलं आहे.
पाकिस्तानकडे कोणत्याही सामंजस्य कराराशिवाय आण्वीक शस्त्रे असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे चीन आणि पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधावरून बोलत असताना बायडेन यांनी पाकिस्तानबाबत हे विधान केलं. तसेच पाकिस्तान सर्वाधिक धोकादायक देश असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
मात्र, एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली असली, तरी दुसरीकडे पाकिस्तानला शस्त्रास्त्रं पुरवणाऱ्यांमध्ये अमेरिकेचाच मोठा वाटा आहे. सप्टेंबर महिन्यात जो बायडेन यांनी पाकिस्तानला शस्त्र पुरवण्याच्या सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी दिली.
त्यामुळे एकीकडे अमेरिका पाकिस्तानला मदत करतेय आणि दुसरीकडे पाकिस्तानलाच धोकादायक देश म्हणत आहे. यामुळे अमेरिकेची ही भूमिका दुटप्पी असल्याचं चित्र समोर आलं आहे. भारताने अमेरिकेवर या करारानंतर टीका केली होती. भारताचे परराष्ट्र मंत्री यांनी त्यावेळी म्हटलं होतं की, “अमेरिकेने पाकिस्तान लढाऊ विमानांसाठी दिलेलं हे पॅकेज दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आहे की, दहशतवाद वाढवण्यासाठी. लढाऊ विमाने कुठे आणि कोणाच्या विरोधात वापरली जातात हे सर्वांना माहित आहे,” असे प्रश्न परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी उपस्थित केले होते.
हे ही वाचा:
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय नाही’
दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत
काश्मीरच्या सार्वजनिक उद्यानात फडकला १०८ फूट उंच तिरंगा
INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
तर अमेरिकेने म्हटले होते की, “अमेरिकेचे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबतचे संबंध वेगवेगळे आहेत. दोन्ही देशांकडे एका दृष्टिकोनातून पाहणं शक्य नाही. दोन्ही देशांसोबत अमेरिकेची वेगळी भागीदारी आहे.”