38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरक्राईमनामाटेम्पो दरीत उलटून ४० मजूर जखमी

टेम्पो दरीत उलटून ४० मजूर जखमी

Google News Follow

Related

महाबळेश्वर तालुक्यातील मुग देव गावाजवळ टेम्पोला अपघात झाला आहे. मजुरांनी भरलेला हा टेम्पो दरीत कोसळून ४० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या जखमी लहान मुलांना सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

बुलढाणा आणि अकोला येथून कामासाठी काही मजूर या टेम्पोमधून जात होते. त्यावेळी यंत्रावर असताना हा टेम्पो दरीत कोसळला.  महाबळेशवर नजीक मुकदेव येथील कोठरोशी पुलाजवळ ही दुर्घटना घडली आहे.हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तीव्र उतारावर हा टेम्पो दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झालेलं नाही. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

त्याआधी नाशिकमध्ये शुक्रवारी भरधाव वेगात असलेल्या बसची ट्रकला धडक बसून १० जणांचा मृत्यू झाला होता. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून शिर्डीच्या दिशेने जात होती. दरम्यान, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पठारेजवळ ट्रकची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की खासगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला. अपघातात अनेकांचा जागेवरच मृत्यू झाला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा