25 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरअर्थजगतएलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

Google News Follow

Related

सध्या ऑटो सुरु झाला आहे. वाहने प्रदर्शित लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहे ती एलएमएलची स्कूटर. स्कूटर व्यवसायातून बाहेर पडलेली एलएमएल पुन्हा कमबॅक करत आहे. तब्ब्ल पाच वर्षांनि कंपनी नवीन स्कूटर बजाजरात आणण्याचा विचार करत आहे. फक्त आता ती इ-स्कूटर असेल.

या ई-स्कूटरचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. ग्राहक स्टार स्कूटरच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकतात. स्टार इलेक्ट्रिक स्कूटर पुन्हा लॉन्च झाल्यानंतर ब्रँडचे हे पहिले मॉडेल आहे . या स्कूटर टीव्हीएस आयक्युब , ओला एस , बजाज चेतक, अथेर आणि ओकिनावा या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा असेल. लोहिया मशिनरी लिमिटेड (एलएमएल) इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने आपले मॉडेल सादर केले आहे. त्याचे पहिले मॉडेल स्टार ई-स्कूटर आहे, तर ओरियन आणि मूनशॉट इलेक्ट्रिक दुचाकी देखील पुढील काही दिवसांत सादर केल्या जातील.

हे ही वाचा:

तामिळनाडूमध्ये ३५६ कलम लागू करा! सोशल मीडियावर #Article 356 हा ट्रेंड

…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी

महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!

पंतप्रधान मोदी स्वतःच्याच खिशातून करतात आपला वैद्यकीय खर्च

लूक आणि डिझाईनच्या बाबतीत एलएमएल स्टार स्कूटरमध्ये नवीन डिझाइन समाविष्ट करण्यात आले आहे. यासोबतच जुन्या मॉडेलची थोडीशी झलकही यामध्ये पाहायला मिळत आहे. स्कूटरमध्ये काळ्या आणि पांढर्या रंगाची ड्युअल टोन थीम आहे आणि ती मॅक्सी स्कूटरप्रमाणे आहे. प्रकाशाच्या बाबतीत, स्कूटरला एलईडी डेटाइम रनिंग लॅम्पसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत . तसेच, गोल एलईडी हेडलॅम्प, १०-इंच अलॉय व्हील, फ्लश फ्रंट पॅनेल, समोर आणि मागील डिस्क ब्रेक या स्कॉउटरमध्ये समाविष्ट केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
2,004अनुयायीअनुकरण करा
61,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा