26 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरराजकारणइंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा

इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा

एनडीएला २९८ जागा मिळतील असा निष्कर्ष

Google News Follow

Related

इंडिया टुडे सी व्होटर यांच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजूनही सर्वोच्च स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात देशभरात नरेंद्र मोदी यांचा करिश्मा अद्याप कायम असल्याचे दाखविण्यात आले असले तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीला लोकसभेत ३४ जागा मिळतील असा अजब दावा करण्यात आला आहे. भाजपाला मात्र फक्त १४ जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

लोकसभेत देशभरात काय वातावरण असेल. एनडीए, यूपीएला कसे समर्थन लोकांकडून मिळेल, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती यश मिळेल, भाजपाची काय स्थिती असेल अशा विविध मुद्द्यांवर काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

त्यात लोकसभेच्या आता निवडणुका झाल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला २९८ जागा मिळतील असे म्हटले आहे. तर यूपीएला १५३ जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एनडीएचा मतांचा टक्का ४२.८ टक्के असेल तर यूपीएचा टक्का हा २९.६ टक्के असेल.

भाजपाला बहुमतापेक्षा १०-११ जाग जास्त मिळतील, असेही या निष्कर्षात म्हटले आहे. याचा अर्थ २८४ जागा भाजपाला मिळतील असा अंदाज असून काँग्रेसला ६८ तर इतरांना मिळून १९१ जागा मिळतील.

हे ही वाचा:

आर्थिक तंगीने पाकिस्तान बेजार, आता चलनसाठा आटू लागला

सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली

अखेर मालाडच्या बागेतून ‘टिपू सुलतान’ला पळवून लावले

प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे

या सर्वेक्षणानुसार एनडीएला कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये फटका बसेल तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तब्बल ३४ जागा मिळतील आणि एनडीए म्हणजे भाजपा, शिंदे गट आणि आरपीआय यांना मिळून १४ जागाच मिळतील.

भारतात आज सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण याचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना ३९ टक्के लोकांची पसंती आहे तर अरविंद केजरीवाल १६ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहेत. ममता बॅनर्जी या ७ टक्क्यांसह तिसऱ्या तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या १० मध्ये स्थान मिळविले आहे. त्यांना २.२ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा