भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला भगवद् गीतेतून ऊर्जा मिळाली असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भगवद् गीतेच्या पंडुलिपीतील ११ खंडांचे प्रकाशन केले. लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींनी या विशेष खंडांचे प्रकाशन केले. या खंडांत एकवीस विद्वानांनी गीतेवर केलेले भाष्य आहे.
या प्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले. “गीतेने महाभारत कालखंडापासून ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत प्रत्येक वेळीच भारताचे मार्गदर्शन केले आहे. भारताला एकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या आदी शंकराचार्यांनी गीतेला अध्यात्मिक चेतनेच्या रूपात पहिले. आज जेव्हा देश स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करायला सज्ज आहे तेव्हा आपण गीतेची ही बाजू लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गीतेने स्वातंत्र्य लढ्याला ऊर्जा दिली. देशाला एकतेच्या आध्यत्मिक सूत्रात बांधून ठेवले. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना देशासाठी सर्वस्व त्यागण्याची प्रेरणा दिली.” अशी मांडणी पंतप्रधान मोदींनी केली.
आज जब देश आजादी के 75 साल मनाने जा रहा है, तो हम सबको श्रीमद्भगवद्गीता के इस पक्ष को सामने रखने का प्रयास करना चाहिए कि कैसे इसने हमारी आजादी की लड़ाई को ऊर्जा दी, कैसे हमारे स्वाधीनता सेनानियों को देश के लिए अपना सर्वस्व बलिदान करने का साहस दिया। pic.twitter.com/pRd1iBMJ1s
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2021
हे ही वाचा:
“भगवद् गीता आपल्याला मार्ग दाखवते, कोणताही आदेश देत नाही. गीतेतील कर्मयोगाला मंत्र बनवून देशात आज गाव – गरीब, शेतकरी – मजूर, दलित – मागास, समाजतील प्रत्येक वंचित व्यक्ती यांची सेवा करून त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.” असे मोदी म्हणाले.
श्रीमद्भगवद्गीता हमें मार्ग दिखाती है, हम पर कोई आदेश नहीं थोपती।
श्रीमद्भगवद्गीता के कर्मयोग को अपना मंत्र बनाकर देश आज गांव-गरीब, किसान-मजदूर, दलित-पिछड़े, समाज के हर वंचित व्यक्ति की सेवा कर उनका जीवन बदलने के लिए प्रयास कर रहा है। pic.twitter.com/r6an3nZZlK
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2021
पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिंह, जेष्ठ नेते डॉ. कारण सिंह उपस्थित होते. गीतेच्या या अकरा खंडांचे प्रकाशन धर्मार्थ ट्रस्टतर्फे काण्यात आले.