25 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरदेश दुनिया'गिझा पिरॅमिड'चे उघडले नवीन रहस्य

‘गिझा पिरॅमिड’चे उघडले नवीन रहस्य

नवीन रहस्यामुळे शास्त्रज्ञ सुद्धा चकित

Google News Follow

Related

ईजिप्तमधील गिझा पिरॅमिडस सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. त्यामध्ये अनेक रहस्य अजूनही दडलेली आहेत. पण आता शास्त्रज्ञाच्या संशोधनात एक नवीन रहस्य समोर आले आहे. गिझाच्या या पिरॅमिड मध्ये एक लपलेला कॉरिडॉर संशोधनात सापडला आहे.

सध्या ह्या ४५०० वर्षांपूर्वीचा नऊ  मीटर असलेला हा कॉरिडॉरचा अभ्यास चालू आहे. म्हणजे गिझाची हि भव्य पिरॅमिड ४५०० वर्षांपूर्वी एका राजाने तयार केले असून ती एक कबर  आहे. हि भव्य पिरॅमिड  जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. यामध्ये अशी बरीच रहस्ये आहेत जी अजून उलगडलेली नाहीत हि पिरॅमिड्स असलेली कबर इजिप्तच्या चौथ्या घराण्याची कबर आहे.

ईजिप्तमधील या गिझाच्या  पिरॅमिडमध्ये जो कॉरिडॉर सापडला आहे , तो पिरॅमिडच्या उत्तरेकडील बाजूस सापडला असून हा पिरॅमिड नऊ मीटर लांब असून दोन मीटर रुंद आहे. हा सापडलेला कॉरिडॉर त्या पिरॅमिडच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूमध्ये सापडला आहे. पुरातत्व शास्त्रज्ञ ‘जाही हवास’ आणि पर्यटन मंत्री ‘अहमद इसा’ यांनी या पिरॅमिडच्या सापडलेल्या कॉरिडॉरबद्दल माहिती दिली आहे. या पिरॅमिडमधील अनेक रहस्य आता शास्त्रज्ञांना येणाऱ्या काळात सापडणार असल्याचे ईजिप्तमधील पुरातत्व अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले आहे.

हे ही वाचा :

९ मार्चपासून आम्हाला घालू द्या हिजाब! कर्नाटक सरकारचे हे पाऊल…

विमानातील लघुशंकेचे नवे प्रकरण आले समोर…आता एका विद्यार्थ्याने केले कृत्य

सुप्रिया सुळे मांसाहार करून देवदर्शनाला , शिवतारे यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

मनसे नेते संदीप देशपांडेच्या हल्लेखोरांचा ठाण्यांत शोध  

प्राचीन इतिहासातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या या भव्य गाझाच्या पिरॅमिडच्या रहस्य मिळण्यासाठी पिरॅमिड स्कॅनिंग चा प्रकल्प २०१५ साली सुरु केला आहे. या प्रकल्पासाठी इन्फ्रारेड थर्मोग्राफी , थ्री डी सिम्युलेशन , आणि कॉस्मिक रे- इमेजिंग यांच्यासारख्या नॉन- इन वेसीव्ह तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

काय सापडले कॉरिडॉरच्या शोधात?

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये गुरुवारी या गिझा पिरॅमिडच्या कॉरिडॉरबाबत माहिती देण्यात आली आहे. गिझाच्या या भव्य पिरॅमिडच्या उत्तरेकडच्या प्रवेशद्वाराजवळ नऊ मीटर लांबीचा कॉरिडॉर सापडला आहे. या नव्याने सापडलेल्या पिरॅमिडच्या कॉरिडॉरचे बांधकाम आणि कॉरिडॉरच्या समोरच असलेल्या चुनखडीच्या संरचनेबाबत आता अधिक माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.

ईसापूर्व २५६० राजा फारो खुफू आणि चीप्सच्या कारकिर्दीत हे गिझाचे भव्य पिरॅमिड कबर म्हणून बांधले गेले होते. या भव्य पिरॅमिडच्या उंची १४६ मीटर म्हणजेच ४७९ फूट होती, पण आता फक्त १३९ मीटरचाच भाग उरला आहे. १८८९ मध्ये पॅरिसमधल्या आयफेल टॉवरच्या बांध कामाआधी हि गिझाचे भव्य पिरॅमिड मानवाने निर्माण केलेली सर्वात उंच रचना होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा