29.2 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरविशेषबिग बी म्हणाले,तुमच्या प्रार्थनेने मी बरा होत आहे

बिग बी म्हणाले,तुमच्या प्रार्थनेने मी बरा होत आहे

'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्यानंतर आता आपल्या तब्येतीबद्दल अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून दिली माहिती

Google News Follow

बिग बी अमिताभ बच्चन नुकतेच ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाले होते. एक अॅक्शन सीन शूट करताना त्याला बरगडीला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. ही बातमी सोशल मीडियावर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बिग बींच्या अपघाताने त्यांच्या चाहत्यांची झोप उडाली आहे. बिग बीच्या चाहत्यांना त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत. आता खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीचे अपडेट चाहत्यांशी शेअर केले आहेत. आपल्या तब्येतीबद्दल अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्यानंतर आता आपल्या तब्येतीबद्दल अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ‘तुमच्या प्रार्थनेने मी बरा होत आहे आणि विश्रांती घेत आहे.’ असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलेआहे. या ट्विटनंतर चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बिग बी लवकर बरे होण्यासाठी प्रत्येकजण कमेंट करून प्रार्थना करत आहे.

हे ही वाचा:

आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”

‘पर्यावरणपूरक’ रंग वापरून होळी साजरी करा

औरंग्या बुडाला पण पिलावळीचं काय?

माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या घरी एसीबीची छापेमारी

हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान अॅक्शन शॉट करताना अमिताभ बच्चन जखमी झाले. त्यांना रिब कार्टिलेज पॉप झाला आहेय. त्यांच्या बरगडीचे पिंजऱ्याचे स्नायू ताणले गेले होते. यानंतर, त्यांना तात्काळ हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. बिग बी आता घरी परतले आहेत. ‘श्वास घेणे आणि हालचाल करत्यांना त्रास होत आहे असे अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे, त्यामुळे कामकाज तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा