25 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरक्राईमनामाव्यावसायिकावर करत होता जादूटोणा, गुन्हा दाखल

व्यावसायिकावर करत होता जादूटोणा, गुन्हा दाखल

आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे

Google News Follow

Related

पश्चिम उपनगरातील बोरिवली येथे एका व्यवसायिकला जादूटोणा करून त्याला घाबरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

बोरिवली पश्चिमेला असणाऱ्या कांदरपाडा मायकलवाडी या ठिकाणी लुईस वैती (६७)या व्यावसायिकाचे कार्यालय आहे. लुईस वैती यांच्या कार्यालयाच्या शटरवर गेल्या आठवड्यात अज्ञात व्यक्तीने टाचण्या टोचलेला लिंबू मिरची हळद कुंकू लावून लटकावला होता, तसेच शटरला एक लाकडी फळी ठेवून त्याच्यावर ‘एक लडका है, वो भी उपर जायेगा’ असे लिहून ठेवले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवसायिक कार्यालय उघडायला आले असता हा प्रकार बघून त्यांना धक्काच बसला,व घाम फुटला. व्यवसायिकाला एकुलता एक मुलगा मुलगा असल्यामुळे ते भयंकर घाबरले होते. त्यांनी तडक एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांना धीर दिला व घटनास्थळ गाठले.

हे ही वाचा:

ठाकरे, राऊत, केजरीवाल सगळेच ठरले ‘अनपढ’!

जामीन मागण्यासाठी राहुल गांधींचे शक्तिप्रदर्शन

नाकं उडवणाऱ्यांनी नाकं मुठीत घेतली!

दहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार

व्यवसायिक वैती यांच्या कार्यालयाजवळ ठेवण्यात आलेले लिंबू मिरची व इतर वस्तू ताब्यात घेऊन महाराष्ट्र नरबळी, अमानुष प्रकार, जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून जवळच असणाऱ्या इमारतीत असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक इसम या वस्तू ठेवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवली असता गोकुळ भरवाड असे या व्यक्तीचे नाव असून तो त्याच परिसरात राहणारा आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्याच्या शोधासाठी पोलीस पथक त्याच्या मागावर पाठवण्यात आले असून त्याने असा अघोरी प्रकार का केला याबाबत अद्याप कळू शकलेले नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा