अनिल जयसिंघानियाला मागील महिन्यात गुजरात येथून मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अनिल जयसिंघानी गेल्या सात ते आठ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर १४-१५ गुन्हे दाखल आहेत. सट्टेबाजीच्या प्रकरणात तीनदा अटक करण्यात आली होती. जयसिंघानी दुबई, कराची आणि दिल्लीतील सट्टेबाजी सिंडिकेटशी संबंधित असल्याचेही समजते. अनिल हा देशातील टॉप बुकी मानला जातो.
ईडीकडून झालेल्या तपासादरम्यान जयसिंघानीची बेकायदेशीर सट्टेबाजीतून खरेदी केलेली मालमत्ता १०० कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. ईडी शहरातील दोन आणि दुबईतील काही परदेशी खेळाडूंसह काही बड्या बुकींमधील संबंधांची चौकशी करत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या १० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जयसिंघानीला शहर पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती. खंडणी प्रकरणात जयसिंघानी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. ईडीकडून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
हे ही वाचा:
ट्विटरची ब्ल्यू टिक हरवली, आम्हाला नाही मिळाली!
चित्ता’कर्षक नावे; एल्टन झाला गौरव तर ओबानला नाव मिळाले पवन !
मराठा आरक्षणाबाबत सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात
पाठीच्या कण्याच्या मदतीने त्याने खेचले तब्बल १,२९४ किलो वजनाचे वाहन
२०१५ मध्ये मनी लाँड्रिंगचा खटला दाखल झाला होता, ज्यात तो वॉन्टेड आरोपी होता. ईडीने पुढील तपासासाठी जयसिंघानीला अहमदाबादला नेले आणि त्याच्या कोठडीसाठी विशेष कोर्टात हजर केले. गेल्या आठवड्यात तब्येतीची समस्या असल्याची तक्रार केल्यानंतर विशेष न्यायालयाने जयसिंघानीला ईडीच्या कोठडीत पाठविण्यास नकार दिला.विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत ईडीने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सोमवारी जयसिंघानीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात लाच प्रकरणात जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला अटक करण्यात आली होती. अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित झाले. त्यानंतर अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना विनंती केली की, वडिलांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांना गुन्हे किंवा तक्रारीमधून वाचवावे. मात्र या गोष्टीला अमृता फडणवीस यांनी नकार दिल्याने अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असे हे प्रकरण आहे.