27 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरराजकारणबंगल्याच्या नूतनीकरणासाठी ४५ कोटींचा खर्च करणारे केजरीवाल हे ‘महाराज’

बंगल्याच्या नूतनीकरणासाठी ४५ कोटींचा खर्च करणारे केजरीवाल हे ‘महाराज’

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले बोचरे आरोप

Google News Follow

Related

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या घराच्या नूतनीकरणासाठी ४५ कोटी खर्च केल्यावरून आता राजकारण तापले आहे. भाजपाने केजरीवाल यांना महाराज अशी उपाधी दिली असून राजेदेखील केजरीवाल यांच्यासमोर कुर्निसात करण्यासाठी झुकले असते, अशी टीकाही करण्यात आली आहे.

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी हा आरोप करताना केजरीवाल यांनी २० ते ५० कोटी रुपये ही बातमी न दाखविण्यासाठी मीडियाला ऑफर केल्याचेही म्हटले आहे. पण वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी ही ऑफर धुडकावून लावली.

जो ४५ कोटींचा खर्च केला आहे त्यात आठ महागडे पडदेही विकत घेण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येकी ८ लाखांचा खर्च करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. व्हीएतनामहून १.१५ कोटींच्या संगमरवरी लाद्याही आणण्यात आल्या आहेत. तर लाकडी भिंतींसाठी ४ कोटी खर्च करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

डबल-ढोलकीच्या तालावर…

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू

पात्रा यांनी केजरीवाल यांच्यावर आऱोप करताना हा निर्लज्ज राजा आहे, असे म्हटले आहे. केजरीवाल यांनी मध्यंतरी दिल्ली विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजाची उपमा देत एक कहाणी सांगितली होती, त्यावरून पात्रा यांनी केजरीवाल यांच्यावर हा घणाघात केला.

पात्रा यांनी केजरीवाल यांची जुनी भाषणेही ऐकविली. त्या भाषणांत केजरीवाल हे राजकारण्यांच्या मोठमोठ्या घरांच्या आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या विरोधात बोलताना दिसतात. आपले घर चार ते पाच खोल्यांचे आहे आणि आपल्याला असे मोठे घर नको, असेही ते म्हणत असत.

पात्रा यांनी आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्यांना पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना उत्तर देण्याची मागणी केली आहे.

आपचे नेते राघव चढ्ढा यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, केजरीवाल ज्या घरात राहतात ते १९४२मध्ये बांधलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे नूतनीकरण व्हायला हवे अशी सूचना केली होती.

काँग्रेसचे नेते अजय माकन यांनीही केजरीवाल यांच्यावर टीका केली. जनतेचा पैसा त्यांनी आपल्या बंगल्यावर खर्च केला आहे. त्यात डायर पॉलिश, व्हीएतनामच्या लाद्या, महागडे पडदे, उंची कार्पेट यांचाही समावेश होता.

माकन म्हणाले की, केजरीवाल यांनी आधी म्हटले होते की, आपण लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. शिवाय, मोठ्या बंगल्यात राहणार नाही. एका सामान्य घरात राहीन. आपल्या पक्षाचे नाव आम आदमी पार्टी असे असले तरी कोरोनाच्या काळात जेव्हा लोकांना ऑक्सिजनची गरज होती तेव्हा केजरीवाल हे बंगल्यावर खर्च करत होते.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा