28 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरविशेषपैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून भीषण अपघात

पैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून भीषण अपघात

बुलढाण्यामध्ये रात्री प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Google News Follow

Related

बुलढाण्यामध्ये रात्री प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शेगाववरून पुण्याच्या दिशेने निघालेली बस पैनगंगा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

चिखली तालुक्यातील पेठ परिसरात ही घटना घडली आहे. ही खासगी ट्रॅव्हल्स बस शेगाववरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. बस चिखली रोडवरील पेठ जवळ आल्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये बसमधील एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड

ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, कर्नाटकमधील ‘हा’ समज बदलणार?

८६ वर्षीय डॉक्टरची नोकराने केली हत्या

अपघाताची माहिती मिळताच पेठ येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघाताचा पुढील तपास बुलढाणा पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा