29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामाअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ

Google News Follow

Related

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली असून अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाकडून त्यांना जबरदस्त दणका बसला आहे. लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. तसेच लैंगिक छळ आणि बदनामी केल्याबद्दल त्यांना ५० लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.

१९९० च्या दशकात एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी ट्रम्प दोषी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी अनेकदा कॅरोलला खोटे पाडण्यासाठी बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, अस निरीक्षण नोंदवून न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. कॅरोलला ५० लाख डॉलर्सची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

कॅरोल हिने केलेला बलात्काराचा आरोप नाकारला असून हा खटला फौजदारी न्यायालयात नव्हे तर दिवाणी न्यायालयासमोर आणला गेला होता. ट्रम्प यांच्याविरोधातील या प्रकरणाची सुनावणी २५ एप्रिलपासून सुरू झाली होती आणि आता नऊ सदस्यांच्या ज्युरीने ट्रम्प यांना लैंगिक शोषणप्रकरणी दोषी ठरवले आहे.

हे ही वाचा:

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, कर्नाटकमधील ‘हा’ समज बदलणार?

८६ वर्षीय डॉक्टरची नोकराने केली हत्या

‘चॅटजीपीटी’चा पहिला बळी; चीनमध्ये खोट्या अपघाताची बातमी करणाऱ्याला अटक

धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!

काय आहे प्रकरण ?

मॅनहॅटनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये ट्रम्प यांनी १९९६ मध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कॅरोलने हिने केला आहे. कॅरोलने २०१९ मध्ये एका पुस्तकात या घटनेचा पहिल्यांदा उल्लेख केला होता. गेल्या काही वर्षांत डझनहून अधिक महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्याची माहिती आहे. यामध्ये पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिचाही समावेश आहे. लैंगिक छळाच्या या प्रकरणांमुळे ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या निर्णयाला धक्का बसू शकतो अशी चर्चा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा