27 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरक्राईमनामाइस्लाम कबूल न केल्यामुळे पत्नीची केली हत्या

इस्लाम कबूल न केल्यामुळे पत्नीची केली हत्या

वडिलांनीच आईची हत्या केल्याची ९ वर्षांच्या मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक लव्ह जिहादची घटना घडली आहे. हिंदू असलेल्या आपल्या दुसऱ्या पत्नीला धर्मांतरण करण्यास सांगितल्यानंतर तिने नकार दिला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव इक्बाल अहमद असून तो पेशाने डॉक्टर आहे.

सन २०२१मध्ये दोन साथीदारांच्या मदतीने दुसऱ्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी डॉक्टर असलेल्या व्यक्तीला उत्तर प्रदेशातील बरेली येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या व्यक्तीला दोषी ठरविण्यात त्याच्याच नऊ वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.

बरेली येथे क्लिनिक चालवणाऱ्या आरोपी डॉक्टर इक्बाल अहमदने २०१२ मध्ये निशा देवीशी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुली होत्या. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी निशा त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. तसेच,  डॉक्टर बेपत्ता होते. मुलीने नंतर आजीला सांगितले की,  तिच्या वडिलांनी तिच्या आईची हत्या केली आहे. शवविच्छेदन अहवालात निशादेवी यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे सिद्ध झाले.

“निशादेवीने इक्बालवर विश्वास ठेवावा, यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता. मात्र यासाठी निशादेवीने नकार दिला. नंतर तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले, ’ असे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सचिन जैस्वाल यांनी सांगितले. ‘नऊ वर्षांच्या मुलीच्या वक्तव्याने आरोपीला अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिची आई टीव्ही पाहात असताना,  तिचे वडील आणि दोन जणांनी तिची हत्या केल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. गुन्ह्याचे निर्घृण स्वरूप पाहून आम्ही फाशीच्या शिक्षेसाठी युक्तिवाद केला,’ अशी माहिती जैस्वाल यांनी दिली.

हत्या करणारा इक्बाल याने निशा देवी यांना डॉ. राजू शर्मा या नावाने स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर या दोघांचा प्रेमविवाह झाला. हिंदू पद्धतीने हा विवाह पार पडला. सहारणपूर येथे ते राहात होते.पण नंतर हे लक्षात आले की, सदर राजू शर्मा उर्फ इक्बाल हा आधीच विवाहित होता. बरेली येथे राहायला गेल्यावर निशा देवी यांना आपल्या पतीचे दुसरे लग्न झाल्याचे लक्षात आले. तेव्हा आरोपी इक्बालने निशा देवी यांना इस्लाम स्वीकारण्याची सक्ती करायला सुरुवात केली. पण तिने त्यास नकार दिला. त्यानंतर तिचा मृतदेह घरात सापडला, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सचिन जैस्वाल यांनी सांगितले.

हे ही वाचा:

इम्रान खानचे समर्थक ठरले मोरावर चोर

विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढून कपडे उलट घालायला लावले

‘द केरळ स्टोरी’ने पाच दिवसात जमवले ‘इतके’ कोटी

सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आली आहे

त्यानंतर इक्बालवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि तीन महिन्यांनी त्याला अटक केली गेली. तेव्हा त्याने मोहम्मद यासिन आणि मिसारयार खान उर्फ मिश्रा यांच्या मदतीने पत्नीचा खून केल्याचे उघड केले. पण तिसरीत शिकत असलेल्या त्यांच्या ९ वर्षीय मुलीने पोलिसांना दिलेल्या साक्षीत आपल्या आईला टीव्ही पाहात असताना वडील आणि अन्य दोघांनी मिळून ठार मारल्याचे सांगितले.

सध्या द केरळ स्टोरी हा चित्रपट चर्चेत असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे लव्ह जिहाद असे काही नसतेच हे ओरडून सांगणाऱ्यांना चपराक मिळाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा