28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरदेश दुनियाइम्रान खानचे समर्थक ठरले मोरावर चोर

इम्रान खानचे समर्थक ठरले मोरावर चोर

कॉर्प्स कमांडरच्या घरातून केली मोरांची चोरी

Google News Follow

Related

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ केली. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये आगडोंब उसळला आहे.

इम्रान खान यांच्या समर्थकांनी लाहोरमधील कॉर्प्स कमांडरच्या घराची तोडफोड आणि लूटमार केली. त्या वेळी आंदोलकांनी या घरात ठेवलेल्या मोरांसह बर्‍याच वस्तूंची लूट केली. व्हॉईस ऑफ अमेरिका (VOA) उर्दूने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, एक माणूस आपल्या हातात मोर धरलेला दिसत आहे.

‘ हे मोर लोकांच्या, नागरिकांच्या पैशाने विकत घेतले होते. हा मोर आमचा आहे. त्यामुळे मी तो घेतला,’ असे तो या व्हीडिओत सांगत आहे. अनेकांनी या कमांडरच्या घरातून मोर चोरले. मागे घर जळत असताना त्याच घरापुढे दोन व्यक्ती पांढऱ्या रंगाचे दोन मोर हातात धरतानाचा व्हिडीओही दिसत आहे.

हे ही वाचा:

पैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून भीषण अपघात

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला!

आता परदेशातील प्रेक्षकही बघणार ‘द केरला स्टोरी’

विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढून कपडे उलट घालायला लावले

इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्टच्या गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली. १ मे रोजी रावळपिंडी येथे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. त्यानंतर ते न्यायालयात सुनावणीसाठी आले असता, त्यांना अटक करण्यात आली. इम्रान खान यांच्या अटकेनंतर लगेचच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले, परिणामी देशभरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

समर्थकांपैकी काहींनी लाहोर कॅंटमधील कॉर्प्स कमांडर्स हाऊस आणि रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयातही घुसखोरी केली. ‘सांगितले होते, इम्रान खानला त्रास देऊ नका,’ असा आंदोलकांचा इशारेवजा आवाज ऐकू येत होता. इम्रान खान यांच्या पक्षाने अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्या सुटकेची मागणी करत अनेक समर्थक रस्त्यावर उतरताना दिसत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा