32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरविशेषभारतातील ४२,००० कुशल कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीच्या संधी

भारतातील ४२,००० कुशल कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीच्या संधी

बांधकाम , नर्सिंग क्षेत्रात वाव, करारावर स्वाक्षरी

Google News Follow

Related

भारतातही कुशल कामगारांना आता इस्रायलमध्ये तापुरत्या नोकरी मिळण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इस्रायल आणि भारत या उभय देशांमध्ये या संदर्भातील एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहेत. त्यामुळे जवळपास ४२,००० भारतीय कामगारांना इस्रायलमध्ये बांधकाम आणि नर्सिंग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. नर्सिंग केअरच्या प्रतीक्षेत असलेल्या इस्रायलमधील हजारो कुटुंबांना यामुळे मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती.इस्रायलचे परराष्ट्र मंत्री तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते.  त्यानुसार ३४ हजार भारतीयांना क्षेत्रात आणि आठ हजार जणांना नर्सिंगच्या विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध होणार आहे. भारतीय नेत्यांसोबतच्या चर्चेत दोन्ही देशांनी विद्यमान द्विपक्षीय संबंधांचा तपशीलवार आढावा घेतला आणि धोरणात्मक संबंध अधिक घट्ट करण्याबाबत चर्चा केली.

हे ही वाचा:

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला!

ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, कर्नाटकमधील ‘हा’ समज बदलणार?

इस्रायलमध्ये भारतीय मजुरांना तात्पुरता रोजगार देण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यानंतर या कराराचा विस्तार करण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोहेन यांच्या माध्यमातून इस्रायली संरक्षण कंपन्यांना भारतात गुंतवणूक प्रोत्साहन देण्यात येणार आहे.भारत आणि इस्रायल यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सुमारे ९ अब्ज डॉलर (संरक्षण क्षेत्राव्यतिरिक्त) आहे . इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हा व्यापार लवकरच २० अब्ज डॉलरपर्यंत अब्जपर्यंत पोहोचू शकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा