28 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरक्राईमनामाबेशिस्त चालकांची आता धडगत नाही; आरटीओ इंटरसेप्टरची संख्या होणार पाचपट

बेशिस्त चालकांची आता धडगत नाही; आरटीओ इंटरसेप्टरची संख्या होणार पाचपट

समृद्धी महामार्ग आणि इतर राज्य महामार्गांवर आता ७४ इंटरसेप्टर कार्यरत आहेत.

Google News Follow

Related

मुंबई-पुणे महामार्गांवर गेल्या पाच महिन्यांत ४० हजारांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता या महामार्गावर स्पीड गन आणि इतर उपकरणे असलेल्या आरटीओ इंटरसेप्टर वाहनांची संख्या जवळपास पाचपट वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केली.

एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि इतर राज्य महामार्गांवर आता ७४ इंटरसेप्टर कार्यरत आहेत. येत्या काही महिन्यांत ही संख्या ३५७पर्यंत वाढेल. ‘पहिल्या टप्प्यात १९६ नवीन इंटरसेप्टरची खरेदी केली जात आहे. ही वाहने लवकरच रस्त्यावर येतील. सरकारने एक्सप्रेसवे आणि महामार्गांसाठी २८३ नवीन इंटरसेप्टर वाहनांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे,’ अशी माहिती भीमनवार यांनी दिली.

वेगवान वाहनांना रोखण्यासाठी आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरी भागांतील रस्त्यांवर आणखी इंटरसेप्टर तैनात केले जाणार आहेत. ही गॅजेट्स आणि स्पीडगन कॅमेरे असलेली सुसज्ज वाहने आहेत, जी एकाच वेळी अनेक वाहनांच्या नोंदी करू करू शकतात. तसेच, परवाना/कागदपत्रांची कामे आता ऑनलाइन होत असल्याने जास्तीत जास्त आरटीओ अधिकारी रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमनासाठी तैनात केले जातील. ज्यामुळे कमी कर्मचारी असलेल्या शहर वाहतूक पोलिसांचा भार कमी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

हे ही वाचा:

मिर्झापूरमध्ये हिंदू असल्याचे भासवून केली महिलेची फसवणूक, लव्ह जिहादचा प्रकार

एक्स्प्रेस वेवर १७ महिन्यांत ३५ वाहनांना आग

परस्पर विश्वास, आदर हे भारत-ऑस्ट्रेलिया दृढ संबंधांचे सूत्र

‘आदित्य राजपूतबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका!’

हे इंटरसेप्टर पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांवर तैनात केले जातील. ‘वाहतूक अधिकारी हाय-टेक स्पीड गनचा वापर करून जास्तीत जास्त वाहने एकाच कॅमेऱ्यात टिपून त्यांच्या वेगाची नोंद ठेवतील. निर्धारित वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवणाऱ्यांना ई-चलान जारी केले जाईल आणि दंड ऑनलाइन भरण्यासाठी मोबाइल फोनवर संदेश मिळतील,’ असे एका वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले. अलीकडच्या काही महिन्यांत पुणे एक्स्प्रेस वेवर मार्गिका बदलणाऱ्या सुमारे सहा हजार ४०० अवजड वाहनचालकांना इंटरसेप्टरच्या मदतीने सुमारे पकडण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा