29 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
घरक्राईमनामाएक्स्प्रेस वेवर १७ महिन्यांत ३५ वाहनांना आग

एक्स्प्रेस वेवर १७ महिन्यांत ३५ वाहनांना आग

सर्वाधिक घटना आठवडाअखेरीस घडतात

Google News Follow

Related

एक्स्प्रेस वेवर गेल्या १७ महिन्यांत ३५ वाहनांना आगीच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात आठवड्याच्या अखेरीस या घटना घडण्याचे प्रमाण अधिक आहे. घाटमाथ्यावर चढताना जड वाहने ऍक्सिलेटरचा वारंवार वापर करत असल्याने ते गरम होऊन शॉर्ट सर्किटच्य घटना घडतात, असे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.  

जानेवारी २०२२ ते मे २०२२ दरम्यान सुमारे ३५ वाहनांना आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी १६ गाड्या असून सहा ट्रक, सहा टेम्पो, एक बस. दोन कंटेनर, एक टँकर आणि तीन अन्य गाड्यांचा समावेश आहे. घाट भागात २२ तर, घाट नसलेल्या भागात १३ घटना घडल्या. प्रत्येक वाराला होणाऱ्या घटनांची नोंद केली असता, बुधवारी दोन, मंगळवारी तीन सोमवारी चार, गुरुवारी पाच, रविवारी पाच, शनिवारी सात तर शुक्रवारी नऊ घटना घडल्या.  

गेल्या वर्षी उन्हाळ्यात १ मार्च ते ३१ मे दरम्यान आगीच्या सहा घटना घडल्या होत्या. तर, यंदाच्या उन्हाळ्यात १ मार्च ते २२ मे दरम्यान नऊ घटना घडल्या. या ३५ घटनांपैकी सर्वाधिक ३२ घटना या शॉर्ट सर्किटमुळे घडल्या असून अन्य तीन अपघातांची कारणे अन्य आहेत.

हे ही वाचा:

गुजरातला एक ‘नो बॉल’ पडला महागात; ऋतुराजने चित्र बदलले

संसद भवनाच्या उद्घाटनाला स्थापित होणाऱ्या राजदंडावर ‘नंदी’ विराजमान

मिर्झापूरमध्ये हिंदू असल्याचे भासवून केली महिलेची फसवणूक, लव्ह जिहादचा प्रकार

‘आदित्य राजपूतबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका!’

वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांची नियमितपणे तपासणी करावी. टायरची अवस्था, हवेचा दाब आणि कूलंट लेवलची पाहणी करावी. गाडीने सहज वेग पकडावा यासाठी वाहनचालकांनी एसी बंद करावा, अशी माहिती बोरघाटचे महामार्ग सुरक्षा गस्त पथकाचे पोलिस अधीङक तानाजी चिखले यांनी दिली. आपत्कालीन घटनेवेळी या क्रमांकावर संपर्क साधा. महामार्ग सुरक्षा गस्त पथक नियंत्रण कक्ष, मुंबई ९५०३५ १११०, महामार्ग सुरक्षा गस्त पथक नियंत्रण कक्ष, मुंबई ०२० २९७४ ०००० ११२ आणि १०३३

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा