33 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरधर्म संस्कृतीसंसद भवनाच्या उद्घाटनाला स्थापित होणाऱ्या राजदंडावर ‘नंदी’ विराजमान

संसद भवनाच्या उद्घाटनाला स्थापित होणाऱ्या राजदंडावर ‘नंदी’ विराजमान

ऐतिहासिक राजदंडाची होणार लोकसभाध्यक्षांच्या शेजारी स्थापना

Google News Follow

Related

येत्या २८ तारखेला नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार असून या उद्घटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचे ठरविले असले तरी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मात्र यासाठी कंबर कसली आहे. या नव्या संसद भवनात एक ऐतिहासिक घटनाही घडणार आहे. नव्या संसदेत ऐतिहासिक सेंगोल म्हणजे राजदंड प्रस्थापित केला जाणार आहे. या सेंगोल तथा राजदंडाच्या अगदी वर टोकाशी नंदी विराजमान असून त्या राजदंडाची लांबी ५ फूट आहे. नंदीची प्रतिमा म्हणजेच न्यायाची प्रतिमा आहे. त्यामुळेच या राजदंडाला वेगळे महत्त्व आहे.

या सेंगोलचा अर्थ आहे संपदा अर्थातच संपत्ती. हा राजदंड तामिळनाडूहून आलेल्या विद्वानांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला जाईल. नंतर तो कायमस्वरूपी संसदेत स्थापित होईल. राष्ट्राला समर्पित करण्यात आल्यानंतर तो राजदंड लोकसभाध्यक्षांच्या खुर्चीजवळ ठेवण्यात येईल. हा राजदंड याआधी अलाहाबाद येथील संग्रहालयात ठेवण्यात आला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सेंगोलसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जवाहरलाल नेहरू यांना विचारण्यात आले की, सत्ता हस्तांतरण सोहळ्यात कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले पाहिजे. त्यावेळी नेहरूंनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. सी. गोपालाचारी यांच्याशी ते बोलले. त्यावेळी सेंगोलच्या प्रक्रियेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. पंडित नेहरू यांनी पवित्र सेंगोलला तामिळनाडूतून आणले आणि इंग्रजांकडून तो सेंगोल स्वीकारला. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने भारताला सत्ताप्राप्त झाली असा त्याचा अर्थ होता.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंना लोकशाही का दिसत नाही?

निवडणूक लढवल्याबद्दल १० वर्षांपूर्वी नोकरीवरून काढलेल्या परिचारिकेला दिलासा

गुजरातला एक ‘नो बॉल’ पडला महागात; ऋतुराजने चित्र बदलले

‘आदित्य राजपूतबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका!’

अमित शहा यांनी सांगितले की, सेंगोल ज्यांच्याकडे सोपविला जातो, त्यांच्याकडून निष्पक्ष आणि न्यायपूर्ण शासनाची अपेक्षा बाळगली जाते. हा सेंगोल चोळ साम्राज्याशी संबंधित आहे. तामिळनाडूमधील पंडितांकडून त्या राजदंडाचे पूजन करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा राजदंड विस्मृतीत गेला. १९७१मध्ये तामिळ विद्वानांनी या राजदंडाचा उल्लेख केला होता. स्वातंत्र्यानंतर जेव्हा राजदंड स्वीकारला गेला तेव्हा जे तामिळी विद्वान उपस्थित होते, ते आज ९६ वर्षांचे आहेत आणि तेही संसद भवनातील कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

सेंगोल हा शब्द शंख या शब्दापासून आलेला आहे. हा राजदंड सोने आणि चांदीपासून बनलेला आहे. त्याच्यावर अनेक रत्न बसविण्यात आली होती. अनेक औपचारिक कार्यक्रमात तेव्हा सम्राटांकडे हा राजदंड असे. सम्राटाकडे कोणते अधिकार आहेत, हे स्पष्ट व्हावे म्हणून त्या राजदंडाचे महत्त्व होते. गुप्त साम्राज्य, चोळ साम्राज्य, विजयनगर साम्राज्य यांनी या राजदंडाचा वापर केला होता. त्यानंतर मुगल साम्राज्यानेही या सेंगोलचा उपयोग केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,023अनुयायीअनुकरण करा
73,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा