29 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरक्राईमनामाकुपवाडामध्ये पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाडामध्ये पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दल आणि जम्मू- काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई

Google News Follow

जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश मिळालं असून तब्बल पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.  हे पाचही दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार, १६ जून रोजी सकाळी लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू केली.  ज्यामध्ये हे सर्व दहशतवादी मारले गेले आहेत. आता संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

कुपवाडामधील जुमागड येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यांनतर जवानांकडून सर्च ऑपरेशन जारी करण्यात आलं. सुरक्षा दलांनी परिसरात घेराव घालून कारवाई केली. या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. सध्या शोधमोहीम सुरू आहे. हे पाचही दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी आहेत.

हे ही वाचा:

शीतल कारुळकर यांना नालंदा नृत्य कला महाविद्यालय गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदाचा बहुमान

आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिस गुन्हे मागे घेणार

कर्नाटकमधील पाठ्यपुस्तकांमध्ये आंबेडकर, नेहरू परतले

‘धरम-वीर’ची जोडी भक्कमच!

तत्पूर्वी १५ जून रोजी, लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेपलीकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. तसेच दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यामध्ये काडतुसे आणि पाकिस्तानमध्ये बनवलेल्या औषधांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा