नेत्यांच्या संपत्तीबाबत नेहमीच वेगवेगळ्या स्वरूपात चर्चा सुरू असते. आता देशातील सर्वात श्रीमंत आमदार कोण याची एक माहिती समोर आली असून त्यात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे सर्वात श्रीमंत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे १४०० कोटी इतकी संपत्ती आहे.
जे पहिले दहा श्रीमंत आमदार आहेत त्यात चार जण हे काँग्रेसचे आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष आमदार पुट्टास्वामी गौडा यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे १२६७ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. त्यानंतर काँग्रेसच्या प्रिया कृष्णा यांचा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे ११५६ कोटी इतकी संपत्ती आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्येही भाजप उमेदवाराची नग्न धिंड काढली होती, त्याचे काय?
फोगाट, बजरंग निवडीसंदर्भात शनिवारी न्यायालय देणार निर्णय
अनधिकृत शाळांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजित पवारांच्या पाठीशी
शिवकुमार यांनी यासंदर्भात विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, आपण सर्वात श्रीमंत नाही पण गरीबही नाही. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्याकडे ही संपत्ती आहे. मी काही श्रीमंत नाही पण गरीबही नाही. पहिल्या दहामध्ये तीन आमदार हे भाजपाचेही आहेत.
काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद म्हणतात की, शिवकुमार यांच्यासारख्या व्यक्ती या उद्योगपती आहेत. मग त्यांच्याकडे संपत्ती असेल तर त्यात वावगे काय? अर्शद यांनी तेवढ्याच भाजपावर शरसंधान साधले. भाजपाच्या आमदारांच्या श्रीमंतीकडेही पाहा. त्यांच्यावर खाण घोटाळ्याचे आरोप आहेत.
त्यावर भाजपानेही टीका केली. काँग्रेसला श्रीमंत लोकच आवडतात. घोटाळ्यात जे लोक होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. दुसरीकडे गरीब आमदारही आहेत. पश्चिम बंगालमधील निर्मल धारा हे आमदार सर्वात कमी संपत्ती असलेले आहेत. त्यांच्याकडे अवघे १७०० रुपये आहेत. त्यानंतर मकरंद मुरली हे ओदिशाचे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्या खात्यात १५ हजार रुपये आहेत.