29 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरदेश दुनियास्पेनमध्ये ५० वर्षांनी उजव्या विचारसरणीचे सरकार येण्याची चिन्हे

स्पेनमध्ये ५० वर्षांनी उजव्या विचारसरणीचे सरकार येण्याची चिन्हे

सँचेझ हे डाव्या पक्षांच्या आधाराने सत्तेवर कायम राहण्याची शक्यता १५ टक्के लोकांनी वर्तवली होती

Google News Follow

Related

स्पेनवासीयांनी रविवारी नवीन सरकारसाठी मतदान केले. मतदानोत्तर चाचणीत सत्ताधारी पंतप्रधान पेड्रो सँचेझ यांचे सोशलिस्ट पक्ष सत्तेतून पायउतार होण्याची तसेच, उजव्या विचारसरणीचा पक्ष तब्बल ५० वर्षांनंतर सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मे महिन्यात स्थानिक निवडणुकीत डाव्यांनी पराभव केल्यानंतर सांचेझ यांनी निवडणूक लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा त्यांचा निर्णय त्यांच्यावरच उलटण्याची चिन्हे आहेत.

 

मतदानोत्तर चाचणीत उजव्या विचारांच्या पीपल पार्टीच्या अल्बर्टो नुनेझ पीजू यांचा विजय होऊ शकतो. मात्र त्यांना सरकार स्थापनेसाठी कडव्या उजव्या विचारांच्या व्हॉक्स पक्षाचे सँटिगो ऍबॅस्कॅल यांची साथ घ्यावी लागेल. त्यामुळे असे झाल्यास फ्रॅन्सिस्को फ्रँकोची हुकूमशाही सन १९७०मध्ये संपुष्टात आणल्यानंतर प्रथमच कडव्या उजव्या विचारांचे सरकार सत्तेत सहभागी होईल.

 

रविवारी रात्री स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे तीन कोटी ७० मतदारांनी मतदान केले होते. मध्यरात्रीपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. डावे आणि उजवे हे दोन्ही पक्ष आघाड्या स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सत्तेवर स्थानापन्न होण्यासाठी ३५० जागांच्या संसदेत किमान १७० जागांची आवश्यकता आहे. कोणत्याही परिस्थितीत नवीन संसदेची स्थापना १७ ऑगस्टपूर्वी होणे गरजेचे आहे. मात्र सरकारस्थापनेबाबतची चर्चा रेंगाळण्याची चिन्हे आहेत.

 

स्पेनच्या एल पैस या वृत्तपत्राने १९जुलै रोजी ओपिनियन पोल जाहीर केला होता. त्यात पीपल्स पार्टी आणि व्होक्स आघाडीच्या विजयाची शक्यता ५५ टक्के लोकांनी व्यक्त केली होती. तर, तर, सँचेझ हे डाव्या पक्षांच्या आधाराने सत्तेवर कायम राहण्याची शक्यता १५ टक्के लोकांनी वर्तवली होती. तर, त्रिशंकू परिस्थिती उद्भवून पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील, असे मत २३ टक्के लोकांनी व्यक्त केले होते.

हे ही वाचा:

‘हेअरकट’मुळे वाढली डोकेदुखी

मणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी शाळा पेटवली

मणिपूर: विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ काढण्यासाठी वापरण्यात आलेला फोन पोलिसांच्या हाती

व्हिएतनामच्या नौदलाला मिळाली भारताची ‘कृपाण’ शक्ती

जेव्हा सँचेझ माद्रिद येथे मतदान करण्यासाठी गेले, तेव्हा लोकांच्या एका छोट्या जमावाने मोठ्या आवाजात त्यांना ‘खोटारडा’ असे संबोधले. तसेच, काही जण ‘पंतप्रधान’ म्हणून त्यांच्या नावाचा जयघोष करत होते. त्यांनी त्यांचाच विजय होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. सँचेझ हे सन २०१८मध्ये पंतप्रधानपदावर विराजमान झाले होते. मात्र त्यांच्याच कार्यकाळात आलेली करोना साथ आणि त्यामुळे झालेल्या आर्थिक परिणामांचा फटका त्यांना सहन करावा लागला. त्यांनी सत्ता स्थापन करताना कडव्या डाव्या विचारसरणीच्या पक्षांशी आघाडी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा