34 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरविशेषदेशात लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

देशात लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील वाहणाऱ्या पाण्याच्या आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य

Google News Follow

Amit Kale

जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार देशामध्ये २३.१४ दशलक्ष लघु जलसिंचन योजनांची नोंद झाली आहे, ज्यापैकी २१.९३ दशलक्ष (९४.०८%) योजना भूजल आणि १.२१ दशलक्ष योजना (५.२%) भूपृष्ठावरील जल योजना आहेत. देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक लघु जलसिंचन योजना आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत. भूजल योजनेतही उत्तर प्रदेश आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये आहेत. भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, ओदिशा आणि झारखंड या राज्यांचा सर्वाधिक वाटा आहे.

भूजल योजनांमध्ये डगवेल्स, कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांचा समावेश आहे. भूपृष्ठावरील योजनांमध्ये पृष्ठभागावरील वाहते पाणी आणि उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. ५ व्या सिंचन योजना गणनेच्या तुलनेत ६ व्या गणनेत लघु जलसिंचन योजनांमध्ये १.४२ दशलक्ष योजनांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर भूजल आणि भूपृष्ठावरील अशा दोन्ही योजनांमध्ये अनुक्रमे ६.९% आणि १.२% वाढ झाली आहे.

हेही वाचा..

फडणवीस यांच्यावरील खालच्या भाषेतील टीका खपवून घेणार नाही

एनएसईत ५० लाख लोक गुंतवणूक करत होते आज ती संख्या ७.५ कोटी

दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा

लघु जल सिंचन योजनांमध्ये डगवेल्सचा सर्वाधिक वाटा आहे, त्याखालोखाल कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक डगवेल्स, भूपृष्ठावरील वाहणाऱ्या पाण्याच्या आणि उपसा सिंचनाच्या योजना आहेत. तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब ही राज्ये अनुक्रमे कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांमध्ये आघाडीवर आहेत. सर्व लघु सिंचन योजनांपैकी ९७.०% योजना वापरात आहेत. २.१% योजना तात्पुरत्या स्वरुपात वापरात नाहीत, तर ०.९% योजना कायमस्वरुपी बंद आहेत. कमी खोलीवरील आणि मध्यम खोलीवरील योजना वापरात असलेल्या योजनांमध्ये आघाडीवर आहेत. लघु सिंचन योजनांपैकी बहुसंख्य (९६.६%) योजना खाजगी मालकीच्या आहेत. भूजल योजनांपैकी खाजगी मालकीचा वाटा ९८.३% आहे तर भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये खाजगी मालकीचा वाटा ६४.२% आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा