26 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरदेश दुनियान्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप

न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप

अमेरिकेतील अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती

Google News Follow

Related

जगभरातील सर्वांत विकसित राष्ट्रांपैकी एक असणाऱ्या अमेरिकेतील अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती ओढवली आहे. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, पेन्सिल्वेनिया आणि कनेक्टिकट यांसारख्या राज्यातील नागरिकांचे पुरामुळे अतोनात हाल झाले आहेत. न्यूयॉर्कची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मॅनहॅटन, ब्रुकलिन, क्वीन्स, ब्रोंक्स, स्टेटन आणि लाँग आयर्लंडमध्ये अचानक पूरपरिस्थिती उद्भवण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी न्यूयॉर्क आणि आसपासच्या शहरांत मोठा पाऊस आल्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवली.

संपूर्ण मेट्रोमार्ग बंद झाले आहेत. अनेक रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. त्यामुळे शाळांमधील मुलांना वरच्या मजल्यावर नेण्यात आले. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने न्यूयॉर्कवासींनी घरांमध्येच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, तळघरात राहणाऱ्यांना सांभाळून राहण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रुकलिनमध्ये सहा इंच तर सेंट्रल पार्कमध्ये पाच इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र आठ इंचापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांनी घरातच राहावे, असा सल्ला गव्हर्नरने दिला आहे. न्यूयॉर्कमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने अनेक जण गाड्यांमध्ये तर, घरांमध्ये अडकले होते. त्या सर्वांना वाचवण्यात आले आहे. या घटनेत कोणालाही जबर दुखापत झालेली नाही.

हे ही वाचा:

‘इतरांकडून भाषण स्वातंत्र्य शिकण्याची गरज नाही’

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

‘कॅनडा म्हणजे मारेकऱ्यांचा गड’!

मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेवाहतुकीवरही झाला आहे. भुयारी मार्गात केवळ मर्यादित वाहतूकसेवा सुरू आहे. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. न्यूयॉर्क शहरातील विमानउड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. लागार्डिया विमानतळावरील किमान २५९ तर, जॉन. एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील किमान ९४ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा