23 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरदेश दुनियाखलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय

खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय

शीख माणसाची बाजू कॅनडाच्या इमग्रिशेन लवादाने लावून धरली

Google News Follow

Related

खलिस्तानींना घरात राहू देणाऱ्या, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणाऱ्या आणखी एका भारतीयाला कॅनडात आश्रय घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एका खलिस्तानी समर्थक दहशतवाद्याला घरी ठेवणाऱ्या एका शीख माणसाची बाजू कॅनडाच्या इमग्रिशेन लवादाने लावून धरली आहे. भारतात खलिस्तानी दहशतवाद्यांना ठेवणाऱ्या आणि त्यांना खाऊ घालणाऱ्या या शीख माणसाने ते बहुतेक गरजेपोटी केले असावे किंवा त्यांना आश्रय न दिल्यास ते प्रतिशोध घेतील, अशी भीतीतून ते केले असावे, असे सांगून त्याला कॅनडात जाण्याची परवानगी द्यावी, असा युक्तिवाद कॅनडातील लवादाने केला आहे.

 

इमिग्रेशन कायद्याने कोणत्याही सरकारच्या बळजबरीने विध्वंस करण्यात गुंतलेल्या किंवा भडकवत असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधित केले असल्याने भारतीय नागरिक कमलजीत राम कॅनडामध्ये येण्यास अपात्र आहे, असा युक्तिवाद कॅनडा बॉर्डर सर्व्हिस एजन्सी (सीबीएसए)ने केला होता.

हे ही वाचा:

शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत

भारताचा जीडीपी ६.३ टक्के राहण्याची शक्यता

“राज्याचा जीव उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतला”

नांदेड रुग्णालयातील मृत्यूमागे विविध कारणे; औषधांची कमतरता हे कारण मात्र नाही!

रामने सीबीएसएला सांगितले होते की, त्याने १९८२ ते १९९२ दरम्यान भारतातील त्याच्या शेतात सशस्त्र शीख अतिरेक्यांना आश्रय दिला आणि त्यांना खायला दिले. तसेच, खलिस्तान समर्थक चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व जर्नेलसिंग भिंद्रनवाले याच्या अनुयायांनी वेगळ्या शीख राज्यासाठी प्रचारित केलेल्या विचारांचे समर्थन केल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. तथापि, इमिग्रेशन अँड रिफ्युजी बोर्ड (आयआरबी) न्यायाधिकरणाने रामला कॅनडामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी फेडरल सरकारकडे ‘वाजवी कारणे’ नसल्याचा निर्णय दिला आहे.

 

तर, रामने वारंवार सशस्त्र व्यक्तींना आश्रय दिला, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघितली, याची कबुली स्वतः दिली आहे, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. त्याने असे कृत्य केले नसते तर कदाचित दहशतवाद्यांनी त्याला जिवे मारले असते, या मुद्द्याकडेही सरकारने पाहिले पाहिजे, असे आयआरबी न्यायाधिकरण सदस्य हेडी वोर्सफोल्ड यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा