24 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरराजकारणपंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवारांकडून स्पष्टीकरण

पंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवारांकडून स्पष्टीकरण

पत्रकार परिषद घेऊन वाचला निर्णयांचा पाढा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच शिर्डी दौरा केला. यावेळी दौऱ्यावर असताना शेतकरी मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार हे कृषी,मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा सवाल त्यांनी विचारला. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना घेतल्या निर्णयांचा पाढा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन केल्यानंतर माझ्या कृषी खात्यातील सहभागावर काही मुद्दे मांडले. एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. प्रधानमंत्री हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. त्यांनी दिलेली माहिती वास्तवापासून दूर आहे,” अशी टीका शरद पवार यांनी केली.

“२००४ ते २०१४ या काळात देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे होती. २००४ ला देशात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यानंतर मी कटू निर्णय घेतला तो म्हणजे अमेरीकेतीला गव्हाची आयात करणे. दोन ते तीन दिवस फाईलवर सही केली नाही. कारण, भारत कृषीप्रधान देश असताना बाहेर देशातून धान्य आणावे हे मान्य नव्हते. फाईलवर सही केली नाही तर आपल्याला देशात धान्यपुरवठा करता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे धान्य आयात केले, याचा फायदा देशाला झाला,” असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.

“२००४ मध्ये तांदूळ, गहू, कापूस, ऊस, सोयाबीन या सर्व पिकाच्या हमीभावात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ केली. महत्वपूर्ण निर्णयामुळे देशाचा कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा यामुळे बदलला गेला,” असेही शरद पवार म्हणाले. २००४ ते २०१४ मध्ये अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम घेतले. २००५ ला नँशनल हॉर्टिकल्चर मिशन हाती घेतलं. गहू आणि भाताच्या उत्पन्नात‌ या काळात‌ मोठी वाढ झाली. पीककर्जाचा दर ११ टक्के होता तो ४ टक्क्यांवर आणला.  काही बँका ३ लाखांपर्यंत ० टक्क्यांनं कर्ज देत होत्या, असेही शरद पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त

मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा जबाब नोंदवला

पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!

तसेच २०१५ मध्ये नरेंद्र मोदी यांनी माझ्या कामाचे कौतुक केले होते. २०१२ मध्ये जागतिक अन्नसंघटनेनेही मान्य केलं की, तांदळाचं विक्रमी उत्पादन झाले, असंही शरद पवार म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा