25 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेषइस्रायलच्या हल्ल्यात हमास कमांडर मुस्तफा डल्लोलचा खात्मा!

इस्रायलच्या हल्ल्यात हमास कमांडर मुस्तफा डल्लोलचा खात्मा!

आता आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, बेंजामिन नेतान्याहू

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमासच्या युद्धात मृत पॅलेस्टिनींची संख्या ९,००० च्यावर पोहचली आहे.इस्रायल मध्ये १४०० हुन अधिक लोकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने गाझा शहराला चारही बाजुंनी घेरले आहे.आयडीएफकडून शुक्रवारी दावा करण्यात आला की, इस्रायली सुरक्षा दलाने सबरा-तेल-हवा बटालियनच्या कमांडरला ठार केले. गाझा पट्टीमध्ये आमच्या सैन्याने रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात मुस्तफा डल्लोल मारला गेला,” असे आयडीएफने ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

गाझावर घातलेला वेढा हलका करण्यासाठी अरब नेत्यांनी इस्रायलवर दबाव वाढवला आहे आणि तिथल्या नागरिकांना मदत करण्यासाठी किमान काही काळ हल्ले थांबवले आहेत.दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन शुक्रवारी इस्रायलला पोहोचले.राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा ‘युध्दविरामाचा’ संदेश घेऊन ते जॉर्डनलाही जाणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वीच युद्धविरामाची शक्यता फेटाळून लावली आहे.नेतान्याहू म्हणाले, आम्ही आता पुढे जात आहोत…आम्हाला आता कोणीही रोखू शकत नाही.गाझा पट्टीत असणारे हमासचे नेतृत्व नष्ट करण्याची शपथ आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

पुन्हा विनयभंग होईल या भीतीने आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाची विद्यार्थिनी लपली प्राध्यापकाच्या घरात!

पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाणानंतर पुणे विद्यापीठात राडा

आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांची माफी मागावी!

इस्रायली लष्कराने सांगितले की, गाझा पट्टीमध्ये इस्रायली सुरक्षा दलांविरुद्ध लढा देण्यासाठी मुस्तफा डलौलने महत्त्वाची भूमिका बजावली होती.आयडीएफने सांगितले की, गाझा पट्टीमध्ये रात्रभर सर्च ऑपरेशन करत अनेक हमासच्या दहशतवाद्यांना ठार केले.तसेच उत्तर गाझा येथील बीट हानौन येथील सर्च ऑपरेशन दरम्यान असॉल्ट रायफल, सबमशीन गन, ग्रेनेड, स्फोटक उपकरणे, आरपीजी आणि दारुगोळा, तसेच गुप्तचर साहित्य – नकाशे आणि संप्रेषण उपकरणे जप्त करण्यात आल्याचे सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा