27 C
Mumbai
Thursday, March 19, 2026
घरबिजनेसघरगुती कामांसाठी पारंपारिक ‘बाई’वर अवलंबून राहण्याची पद्धत बदलली

घरगुती कामांसाठी पारंपारिक ‘बाई’वर अवलंबून राहण्याची पद्धत बदलली

‘ऑन-डिमांड’ सुविधाने ग्राहक खुश

Google News Follow

Related

शहरी जीवनशैली झपाट्याने बदलत असताना घरगुती कामांसाठी पारंपारिक ‘बाई’वर अवलंबून राहण्याची पद्धतही बदलत आहे. १० मिनिटांत घरपोच मदत देण्याचा दावा करणाऱ्या अ‍ॅप्समुळे आता घर साफसफाई, भांडी धुणे, कपडे धुणे किंवा स्वयंपाकातील मदत काही मिनिटांत उपलब्ध होत आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये या सेवांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या नव्या ट्रेंडमध्ये Urban Company, स्नॅबिट आणि प्रोंटो यांसारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. ग्राहक अ‍ॅपवर जाऊन कामाचे स्वरूप निवडतात आणि काही मिनिटांत कामगार त्यांच्या दारात हजर होतो. पारंपारिक पद्धतीत कायमस्वरूपी बाई ठेवताना तिचे वेळापत्रक, पगार, सुट्ट्या आणि अनुपस्थिती यांचा विचार करावा लागतो; मात्र या अ‍ॅप्समध्ये ‘ऑन-डिमांड’ सुविधा असल्याने ग्राहकांना केवळ गरजेपुरती सेवा घेता येते.
हे ही वाचा:
मध्य पूर्वेतील तणावाचा विमान वाहतुकीवर मोठा परिणाम

चीनकडून अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध

खामेनेई यांच्या हत्येनंतर व्लादिमिर पुतिन यांचा संताप

अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अलिरेझा अराफी इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते

नोएडातील एका ग्राहकाने दिलेल्या अनुभवात असे नमूद करण्यात आले आहे की, पारंपारिक बाई सुट्टीवर असताना अ‍ॅपच्या माध्यमातून २०० ते ३०० रुपयांत तात्काळ मदत मिळाली आणि घरातील कामे वेळेत पूर्ण झाली. विशेषतः नोकरी करणाऱ्या दांपत्यांसाठी किंवा एकटे राहणाऱ्या तरुणांसाठी ही सुविधा सोयीची ठरत आहे.

या मॉडेलचा फायदा कामगारांनाही होत असल्याचा दावा कंपन्यांकडून केला जातो. अ‍ॅपशी संलग्न कामगारांना दरमहा सुमारे २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत कमाईची संधी मिळू शकते. त्यांना कामाचे तास निवडण्याची मुभा, डिजिटल पेमेंट, काही ठिकाणी विमा संरक्षण आणि आपत्कालीन मदत सुविधा दिली जाते. त्यामुळे पारंपारिक असंघटित क्षेत्राच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि संरचित वातावरण उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते.

मात्र या मॉडेलसमोर काही प्रश्नही उभे राहतात. कमी दरात सेवा देताना कंपन्यांना मोठा खर्च सहन करावा लागत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सवलती आणि ऑफर्स देऊन ग्राहक आकर्षित केले जातात, पण भविष्यात दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. कॅब आणि फूड डिलिव्हरी सेवांप्रमाणेच या क्षेत्रातही सुरुवातीला स्पर्धा तीव्र असून नफा कमावणे आव्हानात्मक ठरत आहे.

तज्ज्ञांचे मत आहे की पारंपारिक बाई पूर्णपणे गायब होणार नाही. अनेक कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे जुळलेले विश्वासाचे नाते महत्त्वाचे असते. मात्र तातडीची गरज, लवचिकता आणि डिजिटल सोय या कारणांमुळे १० मिनिटांची हाउस हेल्प सेवा शहरी भारतात वेगाने रुजत आहे. येत्या काळात घरगुती मदतीचा चेहरामोहरा मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा