22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
घरअर्थजगतठाकरे सरकारने सादर केला अर्थसंकल्प

ठाकरे सरकारने सादर केला अर्थसंकल्प

Google News Follow

Related

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी विकासाची पंचसूत्री सादर केली आहेत असे ठाकरे सरकारचे मत आहे. याअंतर्गत कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रासाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. कोरोना काळानंतरचा हा अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून विकासाची पंचसूत्री राबवण्यात येणार आहेत. तसेच कृषि क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आखली आहे. या योजनेत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या दिलेल्या वचनाची पूर्ती या आर्थिक वर्षात करणार आहे. त्याशिवाय वीस लाख शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहेत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरविण्याच्यामुळे घोषणेमुळे पीककर्जात वाढ होण्याची शक्यता आहे.

या अर्थसंकल्पात संभाजी महाराज्यांच्या स्मारकासाठी २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.तसेच शेततळ्याच्या अनुदानात वाढ करून ७५ हजार कोटी रुपये देणार आहेत. जलसंपदा विभागासाठी १३ हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर २०२२-२३ मध्ये २८ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच संगीत क्षेत्रासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. त्याशिवाय मूल्य साखळी योजनेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आज सादर होणार ठाकरे सरकारचा तिसरा अर्थसंकल्प

निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो

निष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम

पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला दिलेला जनतेचा हा आशीर्वाद!

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांवरुन वाढवून ७०० कोटी रुपये करण्यात येणार आहे. ई-वाहन धोरणांतर्गत सन २०२५ पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रीक वाहनांचा हिस्सा १० टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25 टक्के करणार आहेत. तेसच राज्यात ५ हजार चार्जिंग सुविधा उभारणार आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तीस हजार अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे एक लाख रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा