23.5 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरबिजनेससरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ

आठवा वेतन आयोग लवकर होणार लागू

Google News Follow

Related

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. आठवा वेतन आयोग संदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या वेतन आयोगामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होणार असून, विशेषतः कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, पगारवाढ नेमकी किती होणार, हे ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘फिटमेंट फॅक्टर’.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या मूळ पगारावर लावला जाणारा गुणक. याच गुणकाच्या आधारे नवीन मूळ वेतन निश्चित केले जाते. याआधी ६व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर सुमारे १.९२ होता, तर ७व्या वेतन आयोगात तो २.५७ इतका होता. आता ८व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८ ते २.८६ दरम्यान असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर हा फॅक्टर जास्त ठेवण्यात आला, तर कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते.
हे ही वाचा:
फडणवीस आणणार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक

भाजपाचे नेते राज पुरोहित यांचे निधन

स्त्रियांसाठी नैसर्गिक वरदान असलेली ‘ही’ वनस्पती! आयुर्वेदात आहे विशेष महत्त्व

इंडोनेशियात ११ प्रवाशांसह उड्डाण करणाऱ्या विमानाचा संपर्क तुटला

उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा मूळ पगार १८ हजार रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर २.१५ लागू झाला, तर त्याचा नवीन मूळ पगार सुमारे ३८,७०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ इतका झाला, तर हाच पगार ५० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास दुप्पट होऊ शकतो. याशिवाय, महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता असल्याने एकूण मासिक उत्पन्नात मोठा फरक पडणार आहे.

सरकारकडून ८व्या वेतन आयोगाच्या अटींना मंजुरी देण्यात आली असून, हा आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष पगारवाढ लगेच खात्यात जमा होणार नाही. आयोगाचा अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर आणि सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी झाल्यावरच नवीन वेतन लागू होईल. काही कर्मचाऱ्यांना थकबाकीसह पगारवाढ मिळण्याचीही शक्यता आहे. एकूणच, 8वा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारा ठरण्याची चिन्हे आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा