34 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरबिजनेसमहागड्या तिकिटांमुळे विमान प्रवासाकडे प्रवाशांनी फिरवली पाठ

महागड्या तिकिटांमुळे विमान प्रवासाकडे प्रवाशांनी फिरवली पाठ

दिवाळीत विमान उड्डाणांमध्ये मोठी घट

Google News Follow

दिवाळीचा सण म्हटला की गावी जाण्यासाठी आणि कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र, यंदा या उत्साहाला महागड्या विमान तिकिटांचा फटका बसला आहे. वाढते हवाई भाडे आणि विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चातील वाढ यामुळे दिवाळीच्या हंगामात विमान उड्डाणांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच दिवाळीच्या काळात भारतीय विमान कंपन्यांनी आपल्या उड्डाण क्षमतेत कपात केली आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील विश्लेषण करणाऱ्या ‘Cirium’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ६ टक्के कमी उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या काळात २०२० मध्ये हवाई प्रवासावर निर्बंध आल्याने विमान कंपन्यांना उड्डाण क्षमतेत तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत कपात करावी लागली होती. त्यानंतर विमान वाहतूक क्षेत्राने वेगाने पुनरुज्जीवन केले आणि प्रवाशांची संख्याही सातत्याने वाढत गेली. मात्र, यंदा पुन्हा एकदा उड्डाणांची संख्या कमी झाल्याने या क्षेत्रासमोरील आव्हाने स्पष्ट झाली आहेत. महागड्या तिकिटांमुळे प्रवाशांचे बजेट कोलमडले आहे. हैदराबादहून पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे दिवाळीसाठी जाणाऱ्या एका प्रवाशाला एकतर्फी विमान प्रवासासाठी २० हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे मोजावे लागले. सामान्य परिस्थितीत याच रकमेत येण्या-जाण्याचा प्रवास शक्य झाला असता.
हे ही वाचा:
आर्यवीर सेहवागच्या वादळी शतकाने टीम इंडिया उपांत्य फेरीत

पाकचा नन्ना मुन्ना, वय लपवून लावतोय चुना

उत्तर प्रदेशात मतदार यादीची प्रारूप यादी आता १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

हैदराबादच्या भाग्यलक्ष्मी मंदिरात तुफान गर्दीने चारमिनारचे धाबे दणाणले

वाढत्या विमान भाड्याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवरही दिसून येत आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत वार्षिक तुलनेत ६.५ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. विमान कंपन्यांच्या वाढत्या खर्चामागे विमान इंधनाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य आणि आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवरील निर्बंध ही प्रमुख कारणे आहेत. विमान भाडेपट्टा, देखभाल आणि इतर आंतरराष्ट्रीय खर्च डॉलरमध्ये करावे लागत असल्याने रुपया कमजोर झाल्याचा अतिरिक्त भार कंपन्यांवर पडत आहे. काही मार्गांवरील हवाई क्षेत्राच्या निर्बंधांमुळे विमानांना लांबचा मार्ग स्वीकारावा लागत असून इंधन खर्चातही वाढ होत आहे.

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोलाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने उड्डाण क्षमता १ टक्क्याने कमी केली, तर प्रवाशांच्या संख्येत ४.५ टक्क्यांची घट झाली. प्रवाशांकडून मिळणाऱ्या सरासरी उत्पन्नात ३४ टक्क्यांहून अधिक वाढ होऊनही कंपनीला १,८८० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. विशेष म्हणजे, याच काळात कंपनीच्या इंधन खर्चात ६७ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे विमान तिकिटांचे दर वाढवूनही कंपन्यांना नफा मिळवणे कठीण बनले आहे. एकीकडे भारतातील विमान वाहतूक क्षेत्राचा विस्तार होत असताना दुसरीकडे वाढता खर्च आणि महागडी तिकिटे यामुळे प्रवाशांची मागणी प्रभावित होत आहे. इंधन दर आणि रुपयावरील दबाव कायम राहिल्यास आगामी काळात विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा