33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरअर्थजगतबुडत्या सिलिकॉन व्हॅली बँकेला मिळाला फर्स्ट सिटीझनचा आधार

बुडत्या सिलिकॉन व्हॅली बँकेला मिळाला फर्स्ट सिटीझनचा आधार

फर्स्ट सिटीझन बँकेने केली दिवाळखोर सिलिकॉन व्हॅली बँक खरेदी

Google News Follow

Related

दिवाळखोर होत आर्थिक अडचणींच्या खाईत अडकलेल्या अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेला फर्स्ट सिटीझनचा आधार मिळाला आहे. सिलिकॉम व्हॅली बँक खरेदी करण्याची घोषणा फर्स्ट सिटीझन बँकेने केली आहे. बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून सिलिकॉन व्हॅली बँक ही फर्स्ट सिटीझन बँकशेअर इंकने खरेदी केली आहे.

फर्स्ट सिटिझन्स बँक आणि ट्रस्टने सिलिकॉन व्हॅली बँकेच्या सर्व ठेवी आणि कर्जे खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे असल्याचे फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेची ए कूण मालमत्ता १० मार्च रोजी १६७ अब्ज डोळा नोंद झाली आहे. एकूण ठेवी ११९ अब्ज डॉलर होत्या. या व्यवहारात, सिलिकॉन व्हॅली बँकेची ७२ अब्ज डॉलर किमतीची मालमत्ता सवलतीने खरेदी करण्यात आली आहे. ही मालमत्ता१६.५ अब्ज डॉलरच्या सवलतीच्या दराने खरेदी करण्यात आली आहे.

सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोर झाल्यानंतर फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनला तिचा नियमन करणारी संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले. सिलिकॉन व्हॅली बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे सुमारे २० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे आणि ठेव विमा निधीमधील रक्कम कमी झाली आहे. ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही नियमन करणाऱ्या संस्थेला देण्यात आली होती. हे लक्षात घेऊन फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने एक पथक तयार केले होते.

सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील १६ वी सर्वात मोठी बँक होती आणि तिने नवीन-युगातील तंत्रज्ञान कंपन्या आणि उद्यम भांडवलात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले . बँकेत अनेक क्रिप्टोकरन्सी कंपन्यांच्या ठेवीही होत्या. ही बँक १९८३ मध्ये सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे सुरू झाली होती होती. पण नंतर ती आर्थिक अडचणीत सापडली.

हे ही वाचा:

परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई

केरळच्या महिलेने राहुल गांधींसाठी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

मी महाराष्ट्राची मुलगी, आज माहेरी आल्यासारखे वाटते आहे!

ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित

१७ शाखा आता झाली फर्स्ट सिटीझन बँक
सिलिकॉन व्हॅली ब्रिज बँक नॅशनल असोसिएशनच्या १७ शाखा सोमवार २७ मार्च, २०२३ रोजी फर्स्ट-सिटिझन्स बँक आणि ट्रस्ट कंपनी या नावाने उघडतील. सिलिकॉन व्हॅली बँक ग्राहकांनी त्यांना सूचना मिळेपर्यंत त्यांची वर्तमान शाखा वापरणे सुरू ठेवावे. फर्स्ट सिटिझन्स बँकेकडून, त्याच्या इतर सर्व शाखांमध्ये संपूर्ण बँकिंग सेवेला अनुमती देण्यासाठी यंत्रणात्मक तयारी पूर्ण झाली असल्याचे फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशननेने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा