31 C
Mumbai
Wednesday, January 14, 2026
घरबिजनेसतांबे झाले लालेलाल

तांबे झाले लालेलाल

चिलीतील खाण कामगारांच्या संपामुळे तांब्याच्या दरांनी गाठला ऐतिहासिक उच्चांक

Google News Follow

Related

जागतिक कमोडिटी बाजारात तांब्याच्या किमतींनी नवा इतिहास रचला असून, प्रति टन दर  १३,००० डॉलर (सुमारे १०.८ लाख रुपये) च्या पुढे गेला आहे. चिलीमधील प्रमुख तांब्याच्या खाणींमध्ये सुरू असलेल्या कामगारांच्या संपामुळे पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली असून, त्यामुळे तांब्याच्या दरांवर मोठा दबाव आला आहे. लंडन मेटल एक्सचेंज (एलएमई) मध्ये तांब्याची किंमत एका दिवसात ४.६ टक्क्यांनी वाढून सुमारे १३,०४२ डॉलर प्रति टनांवर पोहोचली आहे. यामुळे याआधीचा १२,९६० डॉलर  प्रति टनांचा विक्रम मोडीत निघाला आहे. अमेरिकेतील कॉमेक्स बाजारातही तांब्याचे दर विक्रमी पातळीवर असून, ते ५.९००५ प्रति पाउंडपर्यंत वाढले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, चिलीतील मॅटोवर्डे खाणीत सुरू असलेला कामगारांचा संप हा या दरवाढीमागील प्रमुख कारण ठरत आहे. ही खाण दरवर्षी सुमारे २९,००० ते ३२,००० मेट्रिक टन तांबे उत्पादन करते. जरी हे प्रमाण जागतिक उत्पादनाच्या तुलनेत मर्यादित असले, तरी आधीच तणावग्रस्त असलेल्या बाजारात यामुळे पुरवठ्यावरील चिंता अधिक तीव्र झाली आहे. याशिवाय, एलएमई मधील तांब्याचा साठा सध्या अत्यंत कमी पातळीवर आला असून, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत अधिक स्पष्ट होत आहे. इलेक्ट्रिक वाहन, ऊर्जा प्रकल्प, वीज वाहिन्या आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढलेली मागणी लक्षात घेता, पुढील काळात तांब्याचा भाव हा वाढलेलाच राहू शकतो.

हे ही वाचा : 
सेन्सेक्स ३२२ अंकांनी घसरला

भारत ५०० गीगावॅट स्वच्छ वीज लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर

जेएनयूमध्ये ‘मोदी शहा तेरी कबर खुदेगी’च्या घोषणा

क्रिकेटसम्राट कपिल देव यांचा आज वाढदिवस

बाजार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २०२६ आणि २०२७ या कालावधीत तांब्याच्या जागतिक पुरवठ्यात तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अल्पकालीन चढउतारांनंतरही तांब्याच्या दरांचा दीर्घकालीन कल तेजीचा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही दरवाढ केवळ तांब्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. तांब्यासोबतच अ‍ॅल्युमिनियम आणि झिंक या औद्योगिक धातूंच्या किमतींमध्येही वाढ नोंदवली जात असून, याचा परिणाम बांधकाम, वाहन उद्योग आणि उत्पादन क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा