30.5 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरबिजनेससोनं ४,८०० रुपयांनी महाग, चांदी १.९३ लाखांवर

सोनं ४,८०० रुपयांनी महाग, चांदी १.९३ लाखांवर

दरात मोठी उसळी

Google News Follow

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांनी मोठी झेप घेतली आहे. सोन्याच्या दरात एकाच दिवसात तब्बल ४ हजार ८०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीही ९ हजार रुपयांनी महागली आहे. ऐन सणाच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे सोने-चांदी खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, धनतेरसला सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने बाजारात ग्राहकांची लगबग सुरू असतानाच किमतींनी उच्चांकी झेप घेतली आहे.

दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर मंगळवारी १ लाख ४१ हजार ८०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. बुधवारी त्यात ४ हजार ८०० रुपयांची वाढ होऊन तो १ लाख ४६ हजार ६०० रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८४ हजार रुपयांवरून वाढून १ लाख ९३ हजार रुपयांवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, डॉलरमधील कमजोरी आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींना आधार मिळत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेचे नवनिर्वाचित सिनेटर अब्दुल एल-सैयद यांचे कर्नाटकशी खास नाते

डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत एकाच दिवसात ६४६ कोटींची घट

बाल लैंगिक शोषणाच्या कंटेंटप्रकरणी मेटा इंडियाविरोधात एफआयआर

रिपब्लिकन पक्षाच्या पराभवामुळे व्यापार करारात भारताची बाजू मजबूत होणार?

यापुढे शाहीन बाग होणार नाही !

जागतिक बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव ३ टक्क्यांनी वाढून ४ हजार ४३.९३ डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव ४.५ टक्क्यांनी वाढून ५२.०३ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. अमेरिकेतील राजकीय घडामोडी आणि डॉलरच्या चढ-उतारांचाही या तेजीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उद्या धनतेरसच्या मुहूर्तावर खरेदी करताना ग्राहकांना वाढलेल्या किमतींचा सामना करावा लागणार असून, सोने-चांदीच्या बाजारातील पुढील हालचालींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा