25 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरबिजनेसभारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदी चमकली!

भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदी चमकली!

सोने-चांदीच्या दरात विक्रमी उसळी

Google News Follow

Related

सोने आणि चांदी यांचे दर पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर मंगळवार, २७ जानेवारी रोजी व्यवहार सुरू झाल्यानंतर, सोन्याच्या किमतीत १.४२% वाढ झाली आणि ती प्रति दहा ग्रॅम १,५८,२६० रुपये झाली. याशिवाय, चांदीच्या किमतीत ६.३७% ची मोठी वाढ झाली आहे. आज भारतात चांदीचा दर प्रति किलो ३,५६,०२५ रुपये झाला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी, MCX वर सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १,५५,९६३ रुपये आणि चांदीचा दर प्रति दहा ग्रॅम ३,३४,६०० रुपये झाला.

दोन्ही मौल्यवान धातूंनी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ दिसून येत आहे. कॉमेक्सवर बाजार उघडल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा बुकिंग केल्यामुळे घसरण झाली. पण काही काळानंतर पुन्हा वाढ दिसून येत आहे. कॉमेक्सवर सोन्याचा भाव $५,०६६.३० वर पोहोचला. याशिवाय, चांदीचा दर $११३ वर आला. भारतात, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम १,६१,९५० रुपये झाली आणि एक किलो चांदीची किंमत ३,५६,०२५ रुपये झाली.

हे ही वाचा : 

अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका उडणार?

“पाकिस्तानचा एकमेव अजेंडा म्हणजे भारताला नुकसान पोहोचवणे”

यशस्वी भारत जगाला अधिक स्थिर, समृद्ध आणि सुरक्षित करतो!

गणतंत्र दिवस २०२६: कर्तव्यपथावर भारताची ताकद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टॅरिफ घोषणेचाही सोने आणि चांदीच्या किमतींवर मोठा परिणाम होत आहे. सध्या चांदीची किंमत $११३ च्या आसपास आहे. परंतु गुंतवणूकदार आणि रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी भाकित केले आहे की, २०२६ मध्ये चांदीची किंमत $२०० च्या वर जाईल. याशिवाय, मॉर्गन स्टॅनलीनेही भाकित केले आहे की सोन्याची किंमत प्रति औंस ५७०० पर्यंत जाऊ शकते. यामागील कारण म्हणजे फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची वाढती अपेक्षा आणि जागतिक राजकीय तणाव.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा