युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची चमक फिकी!

MCX वर दर घसरले, गुंतवणूकदार संभ्रमात

युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची चमक फिकी!

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीच्या शक्यतेचा परिणाम गुरुवारी (१६ जुलै) देशांतर्गत वायदा बाजारावर दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा घसरण नोंदवली गेली. बुधवारी MCX वर सोने प्रति १० ग्रॅम ₹१,४२,२५७ वर बंद झाले होते, तर चांदी प्रति किलो ₹२,२०,६२० या पातळीवर स्थिरावली होती. गुरुवारीच्या व्यवहारात दोन्ही मौल्यवान धातूंवर विक्रीचा दबाव कायम राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, इराणने अमेरिकेसोबतच्या चर्चेला नकार दिल्यानंतर पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव अधिक वाढला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची आणि महागाई पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आगामी बैठकीत व्याजदर वाढवू शकते, अशी शक्यता बळावली आहे. व्याजदर वाढल्यास डॉलर अधिक मजबूत होतो आणि अशा परिस्थितीत सोने-चांदीसारख्या व्याज न देणाऱ्या मालमत्तांमधून गुंतवणूक बाहेर पडते. परिणामी, मौल्यवान धातूंवर दबाव वाढत आहे.
हे ही वाचा:
“श्रीकृष्ण मुस्लिम होते, दिवसातून पाच वेळा नमाज पढत होते” मौलाना बरळले

वसई-विरारकरांच्या खिशावर पालिकेचा ‘डाका’!

मान्सूनचा वेग मंदावणार! पश्चिम-दक्षिण भारतात पावसाचा खंड

दुसरीतील हिंदू विद्यार्थ्याला ‘कलमा’ पठणाचा गृहपाठ; शिक्षिकेची हकालपट्टी

विश्लेषकांच्या मते, अल्पकालीन काळात सोने आणि चांदीमध्ये अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडी, डॉलरची मजबुती, कच्च्या तेलातील चढ-उतार आणि अमेरिकेच्या फेडच्या पुढील निर्णयांवर या धातूंची दिशा अवलंबून असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करावी आणि बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. सध्याची घसरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी ठरू शकते, मात्र अल्पकालीन काळात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version