28.8 C
Mumbai
Friday, July 17, 2026
घरक्राईमनामा१५०० रुपयांची उधारी आणि कौटुंबिक वाद; मित्रानेच काढला मित्राचा काटा

१५०० रुपयांची उधारी आणि कौटुंबिक वाद; मित्रानेच काढला मित्राचा काटा

शिवाजीनगरमधील धक्कादायक घटना; धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या

Google News Follow

Related

शिवाजीनगर भागातील म्हाडा कॉलनीत कौटुंबिक वाद आणि केवळ १५०० रुपयांच्या उधारीवरून एका मित्राने आपल्याच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रियाज शेख (२४) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक ३४-बी जवळ रियाज बसला होता. याच वेळी मुख्य आरोपी आणि त्याचे दोन साथीदार तिथे आले. रियाज आणि मुख्य आरोपी हे लहानपणापासूनचे मित्र होते. मात्र, त्यांच्यात काही कौटुंबिक कारणांमुळे आधीपासूनच वाद सुरू होते. याच दरम्यान, आरोपीने रियाजला उसने दिलेले १५०० रुपये परत करण्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.
हे ही वाचा:
कॅप्टन हरमनप्रीतवर उठणारे प्रश्न बंद करा!

सिंधूची विजयी घोडदौड; क्वार्टर फायनलमध्ये धडक

गगनयानला धक्का! इस्रोतील १०० हून अधिक वैज्ञानिकांचा राजीनामा

पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरीसदृश दुर्घटना
वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात मुख्य आरोपीने आपल्याकडील धारदार शस्त्राने रियाजच्या पोटात सपासप वार केले. या हल्ल्यात रियाज गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रियाजला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १६ जुलै रोजी पहाटे १ वाजून १५ मिनिटांनी रियाजने अखेरचा श्वास घेतला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात या गुन्ह्यात मुख्य आरोपीसह अन्य दोन जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा