29.1 C
Mumbai
Thursday, July 16, 2026
घरस्पोर्ट्सकॅप्टन हरमनप्रीतवर उठणारे प्रश्न बंद करा!

कॅप्टन हरमनप्रीतवर उठणारे प्रश्न बंद करा!

Google News Follow

Related

महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारतीय संघाच्या अनपेक्षित एक्झिटनंतर सध्या कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वावर चौफेर टीका होत आहे. भारतीय संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडल्याने ‘कॅप्टन्सी’ बदलण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. मात्र, या संपूर्ण वादात आता भारताची माजी वेगवान गोलंदाज निरंजना नागराजन हरमनप्रीतच्या बचावासाठी ढाल बनून उभी राहिली आहे. हरमनप्रीतच्या कप्तानीमध्ये कोणतीही खोट नाही, तर खरी समस्या टीमच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये आहे, असे म्हणत निरंजनाने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

एक पराभव आणि तुम्ही थेट कॅप्टनवर बोट

‘आईएएनएस’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत निरंजनाने हरमनप्रीतचे जोरदार समर्थन केले. ती म्हणाली

“हरमनप्रीत एक कर्णधार म्हणून सर्वोत्तम काम करत आहे. आपल्याकडे अडचण हीच आहे की, संघ एक मॅच हरला की लगेच सगळे दोष समोर आणले जातात. हरमनप्रीतने जेव्हा वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला, तेव्हा तिचे कौतुक झाले; मग आता एका खराब टूर्नामेंटसाठी आपण तिला पाठिंबा का देऊ शकत नाही? खेळाडूंनाही त्यांची स्पेस मिळायला हवी. शेवटी आपण सगळे माणूस आहोत आणि चुका कोणाकडूनही होऊ शकतात.”

निरंजनाने पुढे ठासून सांगितले की, गेल्या ७-८ वर्षांत हरमनप्रीतने भारतीय संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कठीण सामन्यातही ती मैदानावर एकटी झुंजत होती. कप्तानीचा तिच्या वैयक्तिक कामगिरीवर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही आणि संघ मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक कामगिरी करत आहे. त्यामुळे २०२८ च्या वर्ल्ड कपचा विचार करून ३९ वर्षांच्या हरमनप्रीतला आत्ताच हटवण्याची कोणतीही गरज नाही, असे निरंजनाचे स्पष्ट मत आहे.

…तर ‘हा’ आहे टीम इंडियाचा खरा ‘फ्लो’!

भारतीय संघ आधुनिक टी-२० क्रिकेटच्या वेगाशी जुळवून घेऊ शकत नाहीये का? किंवा संघाला कोणताही ‘मेंटल ब्लॉक’ आहे का? हा प्रश्न निरंजनाने पूर्णपणे फेटाळून लावला. तिने भारतीय संघाची खरी गरज ओळखत एक मोलाचा सल्ला दिला आहे:

  • मिडल ऑर्डरमध्ये ‘पावर हिटर्स’ची तीव्र कमतरता: निरंजनाच्या मते, भारतीय संघाला ७ ते १५ ओव्हर्सच्या दरम्यान धावांचा वेग वाढवणाऱ्या तडाखेबंद फलंदाजांची गरज आहे.

  • हरमनप्रीतवरील प्रेशर कमी करा: जेव्हा मिडल ऑर्डरमध्ये धावांचा वेग वाढवणारे फलंदाज मिळतील, तेव्हा हरमनप्रीतलाही मोकळेपणाने खेळता येईल आणि तिच्यावरील दबाब कमी होईल.

थोडक्यात काय तर…

निवडणूक किंवा निवड समितीचा निर्णय काहीही असो, माजी क्रिकेटपटू निरंजना नागराजनने मात्र हरमनप्रीतच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, सध्या कर्णधार बदलण्यापेक्षा संघातील त्रुटी सुधारण्यावर भर देण्याचा ‘स्मार्ट’ सल्ला दिला आहे. आता निवड समिती यावर काय निर्णय घेते, याकडे क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा