35 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरअर्थजगतसोन्यावरील आयात शुल्कात वाढ

सोन्यावरील आयात शुल्कात वाढ

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही उलथापालथ होतेय त्यामुळे इतर विषयांकडे महाराष्ट्राचं फारसं लक्ष गेलेलं नाहीय. सत्तापालट होत असताना अनेक महत्वाच्या गोष्टी घडल्यात. यातलीच महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क पाच टक्क्यांनी वाढवलाय. त्यामुळे देशात काही दिवसांत प्रति तोळा सोन हजार ते २ हजाराने वाढणार असल्याची सांगितलं जातंय. पण सरकारने सोन्यावरील आयात शुल्क का वाढवलाय.

भारतात निर्यातीच्या तुलनेत आयात जास्त प्रमाणत केलं जात. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. कारण आयात करायचं म्हणजे भारताला डॉलर तेवढ्या प्रमाणात खर्च करावे लागतात आणि डॉलर खरेदी करायचे तर तितका भार आपल्या रुपयावर येतो. कच्च तेल, सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू भारत मोठ्या प्रमाणावर आयात करतो. कच्च तेल आयात करणं ही आपली गरज आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करणं ही काळाची गरज आहे. पण भारतीयांची सोन्याची जी काही हौस आहे ती जग जाहीर आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा दुसरा सोन्याची आयात करणारा देश आहे. भारत जगातील २५ टक्के सोने म्हणजेच दरवर्षी सरासरी आपण आठशे टन सोने खरेदी करतो. भारतीय कुटुंबांकडे १८ हजार टन सोन असून ते जगाच्या स्टॉकपैकी ११ टक्के सोन आहे आणि त्याच मूल्य जवळपास ९५० अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. पण हे ११ टक्के सोन जे भारतीय कुटुंबाकडे आहे त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला तितकासा फायदा नाहीय.

२०२० मध्ये भारताने ४३० टन सोन आयात केलेलं तर २०२१ मध्ये याच्या पेक्षा दुप्पट म्हणजेच १ हजार ५० टन सोन आयात केलेलं. या आयातीवर भारताने जवळजवळ ५५ पूर्णांक ७ बिलियन डॉलर खर्च केलेले. हे भारतीयांचं सोन प्रेम भारताच्या अर्थव्यवस्थेला भारी पडतंय. त्यामुळे कुठेतरी हे कमी होणं गरजेचं आहे. कारण कच्च तेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करणं आपण थांबवू शकत नाही. पण सोन आयात करण्यासाठी आपण करोडो रुपये खर्च करतो ते आपण नियंत्रणात आणू शकतो, म्हणून सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवलाय. पहिला सोन्यावर साडे सात टक्के आयात शुल्क होता तो आता सरकराने वाढवून साडे बारा टक्के केलाय.

रुपया डॉलरच्या तुलनेत जे काही घसरतोय त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. रुपया घसरतोय कारण, जगातील मजबूत अर्थव्यवस्था असणारा अमेरिका देश सध्या महागाईचा सामना करतोय. या महागाईतून उपाय काढण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्ह बँकेने व्याजदर वाढवलाय. यापुढेही अजून फेड बँक व्याजदर वाढवेल असं सांगितलं जातंय. त्यामुळे गुंतवणूकदार विचार करतात की डॉलर जगात मजबूत चलन आहे आणि सध्याच्या परिस्थिती डॉलरमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला भविष्यात आणखी चांगला परतावा मिळेल आणि परतावा नाही मिळाली तरी गुंतवणूक तरी सुरक्षित राहील म्हणून गुंतवणूकदारांनी जो भारतात पैसा गुंतवलाय तो गुंतवणूकदार काढून घेताहेत. पण डॉलरच्या तुलनेत फक्त रुपयाचं नाही तर इतरही चलन घसरत आहेत.

भारताला सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आयतीद्वारे पूर्ण करावी लागतेय. ज्यामुळे रुपया आणखी कमकुवत होतोय म्हणून सोन्याच्या आयातीवर नियंत्रण करणं गरजेचं आहे. भारताचं हे सोनं प्रेम जपण्यासाठी किंवा गुंतवणूक दारांना सोन्यात गुंतवणूक करता यावी म्हणून सरकारने सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम सुरु केलीय. या योजनेतुन सोन्यात गुंतवणूक करता येते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा