32 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरबिजनेसएचडीएफसी बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

एचडीएफसी बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

ईएमआयमध्ये होणार घट

Google News Follow

एकीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थात आरबीआयने तब्बल ४४ महिन्यांनंतर रेपो दरात वाढ करून कर्जदारांच्या व्याजदरावर वाढीचा दबाव निर्माण केला असताना, दुसरीकडे एचडीएफसी बँकेने गृहकर्जदारांना दिलासा दिला आहे. बँकेने आपल्या सर्व कालावधींच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात केली आहे. सुधारित दर ७ ऑक्टोबर २०२६पासून लागू झाले आहेत. त्यामुळे एमसीएलआरशी जोडलेल्या गृहकर्जदारांच्या व्याजदरात आणि परिणामी ईएमआयमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

एचडीएफसी बँकेने एक महिन्याच्या एमसीएलआरमध्ये सर्वाधिक १५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. हा दर ७.९० टक्क्यांवरून ७.७५ टक्क्यांवर आला आहे. ओव्हरनाइट एमसीएलआर ७.९० टक्क्यांवरून ७.८० टक्के, तीन महिन्यांचा दर ८.०५ टक्क्यांवरून ७.९५ टक्के, तर सहा महिन्यांचा दर ८.२५ टक्क्यांवरून ८.१५ टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एक वर्षाचा एमसीएलआर ८.३५ टक्क्यांवरून ८.३० टक्के, दोन वर्षांचा दर ८.४५ टक्क्यांवरून ८.४० टक्के आणि तीन वर्षांचा दर ८.६० टक्क्यांवरून ८.५५ टक्क्यांवर आला आहे.
हे ही वाचा:
दहशतवादाचा ‘भस्मासुर’ पाकिस्तानलाच भारी पडतोय!

दुष्काळमुक्तीचा वसा! शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर झटले नाना

यूपीआयवरील एमडीआर शुल्क पुढच्या वर्षापर्यंत लांबणीवर?

असा ‘नटसम्राट’ होणे नाही….

एमसीएलआर म्हणजे बँक कर्ज देताना वापरत असलेला किमान संदर्भ व्याजदर. बँकेचा निधी उभारण्याचा खर्च, परिचालन खर्च आणि इतर घटकांच्या आधारे हा दर निश्चित केला जातो. ज्या ग्राहकांचे गृहकर्ज एमसीएलआरशी जोडलेले आहे, त्यांच्या कर्जाच्या व्याजदरावर एमसीएलआरमधील बदलांचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एचडीएफसी बँकेच्या या कपातीचा फायदा पात्र कर्जदारांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष ईएमआय किती कमी होईल, हे कर्जाची रक्कम, उर्वरित कालावधी आणि लागू व्याजदरावर अवलंबून असेल.

दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी आरबीआयने रेपो दर ५.२५ टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांवर वाढवला आहे. फेब्रुवारी २०२३नंतर म्हणजेच ४४ महिन्यांनंतर प्रथमच रेपो दरात वाढ झाली आहे. त्यामुळे बाह्य बेंचमार्कशी जोडलेल्या फ्लोटिंग रेट कर्जांच्या व्याजदरावर वाढीचा दबाव येऊ शकतो. मात्र एचडीएफसी बँकेच्या एमसीएलआर कपातीमुळे एमसीएलआरशी जोडलेल्या कर्जदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे कर्जदारांनी आपले कर्ज कोणत्या बेंचमार्कशी जोडलेले आहे, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा