30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरअर्थजगतहवा हवाई प्रवास! तब्बल ११ लाख प्रवाशांनी केले उड्डाण

हवा हवाई प्रवास! तब्बल ११ लाख प्रवाशांनी केले उड्डाण

Related

कोरोनासोबत आपल्याला जगायला लागणार हे एव्हाना आता लोकांना चांगलेच समजले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोक आता भ्रमंतीसाठी बाहेर पडू लागलेले आहेत. याचे चित्र आपल्याला जुलै महिन्यात झालेल्या प्रवासाच्या आराखड्यावरूनच लक्षात येते. जुलैच्या मध्यावर महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी अहवालाशिवाय राज्यात प्रवेश करण्यास परवानगी दिली. त्याचाच परिणाम म्हणजे जूनच्या तुलनेत जुलैमध्ये प्रवासी वाहतुकीत ५९% वाढ झाली आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) च्या प्रवक्त्याने सांगितले की, मुंबई विमानतळाने जुलै महिन्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थळांवर ११४०० पेक्षा जास्त उड्डाणांवर सुमारे १.१ दशलक्ष (११ लाख) प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. देशांतर्गत प्रवास निर्बंध सुलभ झाल्यामुळे, विमानतळावर हवाई वाहतुकीमध्ये वाढ दिसून आलेली आहे. मुख्य बाब म्हणजे विकेंडला ही वाढ अधिक प्रमाणात आढळलेली आहे. शनिवार आणि रविवारमध्ये दोन दिवस आलेल्या सुट्ट्यांचा फायदा अनेकांनी पर्यटनासाठी घेतला.

जुलैमध्ये शनिवार, रविवार गाठून एकूण ५ लाख प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. तसेच याकरता तब्बल ४००० हून अधिक विमानफेऱ्या झाल्या. जूनमध्ये विमानतळावर २७०० उड्डाणांवर ३ लाख प्रवासी शनिवार, रविवार या दोन दिवसात होते. शनिवार, रविवार या दोन दिवसांमध्ये देशांतर्गत विमानसेवा या अधिक फलदायी ठरल्या होत्या. मुंबईतून बहुसंख्य प्रवासी दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद हा प्रवास करताना आढळले. तसेच आंतरराष्ट्रीय मध्ये दोहा, न्यूयार्क आणि दुबईला जाणारे प्रवासी होते.

हे ही वाचा:

पालिकेचे जलतरण तलाव की ‘कुरण तलाव’?

जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

शरद पवारांनी पुन्हा व्यक्त केली ईडीबद्दलची खदखद

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताचे गोल्डमिंटन

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना निर्बंधही शिथील झाले. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यांत प्रवासी वाढल्याचे लक्षात येत आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांचा विचार केल्यास, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशांची संख्या तुलनेने जास्त होती. २०२० मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून २५ मे पर्यंत देशांतर्गत उड्डाणांवर बंदी होती. गेल्या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान मुंबई विमानतळावर केवळ २.६ लाख प्रवासी आढळले होते. यावर्षी मात्र याच कालावधीत १९ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करताना आढळले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा