34 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरबिजनेसअमेरिकेला ८,६०६ टन साखर निर्यातीसाठी भारताची मंजुरी

अमेरिकेला ८,६०६ टन साखर निर्यातीसाठी भारताची मंजुरी

२०२७ या आर्थिक वर्षासाठी निर्यातीचा मार्ग मोकळा

Google News Follow

भारताने अमेरिकेला कच्च्या ऊसाच्या साखरेची निर्यात करण्यासाठी ८,६०६ मेट्रिक टनांचा कोटा निश्चित केला आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) २३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात सार्वजनिक अधिसूचना जारी केली. अमेरिकेच्या आर्थिक वर्ष २०२७ साठी टॅरिफ रेट कोटा (TRQ) योजनेंतर्गत ही निर्यात केली जाणार आहे. या निर्णयामुळे भारतीय साखर उत्पादक आणि निर्यातदारांना अमेरिकेच्या बाजारपेठेत मर्यादित प्रमाणात साखर पाठवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा कोटा १ ऑक्टोबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२७ या कालावधीसाठी लागू असेल.

टॅरिफ रेट कोटा ही आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक विशेष व्यवस्था आहे. याअंतर्गत निश्चित प्रमाणात वस्तूंची आयात किंवा निर्यात ठरावीक शुल्काच्या सवलतीसह करता येते. भारतातून अमेरिका आणि युरोपीय महासंघाकडे होणारी साखर निर्यात या योजनेंतर्गत निर्धारित अटींच्या अधीन राहून मुक्त श्रेणीत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, निर्यातीसाठी निश्चित केलेल्या ८,६०६ मेट्रिक टनांच्या मर्यादेचे पालन करणे आवश्यक असेल.
हे ही वाचा:
हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!

खासगी गुंतवणुकीत सहा महिन्यांत २६.६ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

ऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप

पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त

या संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडा (APEDA) करणार आहे. निर्यातीसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष आणि संबंधित संस्थांची शिफारस अपेडाकडून केली जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार मुंबईतील अतिरिक्त परकीय व्यापार महासंचालक कार्यालयाकडून निर्यातदारांना मूळ प्रमाणपत्र (Certificate of Origin) दिले जाणार आहे. निर्यातदारांना प्रत्यक्ष निर्यातीचे प्रमाण, मूल्य, निर्यातीचे ठिकाण आणि परदेशी खरेदीदारांची माहितीही सादर करावी लागणार आहे.

भारताच्या साखर निर्यात धोरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या व्यापारात स्पर्धा वाढत असताना अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांना मर्यादित का होईना, पण निश्चित संधी मिळत आहे. या निर्यातीचा देशांतर्गत साखर उपलब्धतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नसली, तरी भारतीय साखर उद्योगाला आंतरराष्ट्रीय व्यापारातील उपस्थिती मजबूत करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा